Aliaa Bhatt Instagram/aliaabhatt
मनोरंजन

आलिया का झाली '8' नंबरवर फिदा

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) शनिवारीपासून वर्कआऊटला (Workout) सुरुवात केली आहे. आठवड्याच्या शेवटी एक आरोग्यदायी सुरुवात केली असल्याचे तीने सांगितले आहे. अलीकडेच तीने घरी राहून आपली फिटनेसची दिनचर्या चालू केल्याचे आलीयाने फोटो शेअर करून आपल्या फॅन्स ला सांगितले आहे.

तसेच या फोटोतून रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आवडता 8 नंबर तिच्या कीती हृदयाजवळचा आणि आवडता आहे हे देखिल तिच्या फॅन्सला तिने दाखवून दिले आहे. यामुळे सर्वांचे याकडे लक्ष आता या एका 8 नंबरने वेधले आहे. रणबीर सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नवी दिल्लीत आला असतांना, अलियाने त्याच्या आठवणीत हा 8 नंबर ठेवून त्याला मिस करण्याचा तीने विशेष मार्ग शोधला आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटोत ती आरशा समोर उभी राहून सेल्फी घेतांना दिसत आहे. त्याच्या फोन कव्हरवर 8 हा नंबर असून त्याच्या बाजूला हार्ट शेप आहे.

8 नंबर रणबीरचा आवडता नंबर आहे. आलिया हा नंबर नेहमी तिच्या जवळ ठेवताना दिसते. रणबीरचा फुटबॉल जर्सीच्या नंबरपासून ते कारच्या नंबर प्लेटपर्यंत हा 8 नंबर फेमस आहे.त्याचे 8 नंबरवरचे प्रेम बघून आलिया चकीत झाली असावी. म्हणून तिनेही त्याच्या आठवणीत 8 नंबर आपल्या जवळ ठेवून घेतला असावा. फोटोत आलिया वर्कआऊट ड्रेसमध्ये दिसत आहे. दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा वर्कआऊट ड्रेस घातला आहे.

दरम्यान, रणबीर सध्या श्रद्धा कपूर , बोनी कपूर आणि डिंपल कपाडियासबोत त्यांच्या चित्रपटाच्या शूटसाठी नवी दिल्लीत आहे. आलीया आणि रणविर ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अनाय मुखर्जी हा बॉलीवुडमधील सर्वात मोठा दिग्दर्शक आहे. याशिवाय आलियाने आरआरआर, डार्लिंग्ज, गांगुबाई काठियावाडी आणि रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटात उत्तम काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT