बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आजकाल तिच्या बायबल (Bible) या पुस्तकासाठी बरीच चर्चेत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून करीनाने आपला प्रेग्नन्सीचा अनुभव शेअर केला आहे आणि याखेरीज अनेक खुलासेही केले आहेत. सुरुवातीला ती परिपूर्ण आई नव्हती असे करिनाने पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितले आहे.(Kareena Kapoor Khan said I was not the perfect mother before)
करिनाला बाळाबद्दल असलेली कोणतीही जबाबदारी पार पाडताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. करिनाने पुस्तकात लिहिले आहे की, सुरुवातीला मी परफेक्ट आई नव्हते. तैमूरला (Taimur) डायपर कसे घालायचे हे देखील मला माहित नव्हते. बर्याच वेळा तो सुसु करायचा, आणि ते लीक होयचे कारण मी डायपर व्यवस्थित घालत नव्हते.
करिनाने पुढे सर्वांना सल्ला दिला आणि म्हणाली, 'तुमच्यासाठी जे सोपे आहे ते तुम्ही करावे व तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकाल. जेव्हा आई आत्मविश्वास व आरामदायक असते, तेव्हा बाळही असते. हेच कारण आहे की मी लवकरात लवकर कामावर आले होते.
करिना म्हणाली की, मला माहित आहे की एकटी आई असणे ही त्यांची ओळख नाही आणि म्हणूनच तिने आपल्या गरोदरपणात काम केले आणि मुलाच्या जन्मानंतर लवकरच कामावर परत आली. बाळाला घरी सोडणे आणि कामावर जाणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.
आपला अनुभव सांगताना करिना म्हणाली, 'मला तैमुरला सोडून रात्रीच्या शूटवर गेलेलं आठवते. जरी मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती, परंतु मला तिथे प्रोफेशनल रहावे लागले. जेहचा जन्म झाल्यावर मी पुन्हा कामावर परतले. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी लवकर कामावर परतले, तैमूर माझ्यावर कमी प्रेम करत नाही आणि जेह (Jeh) पण असं करणार नाही.'
करीना अखेर आंग्रेज़ी मीडियम (Angrezi Medium) चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनाबरोबर इम्रान खान आणि राधिका मदन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील करिनाची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.
आता करीना लालसिंग चड्डा (Laal Singh Chaddha) या चित्रपटात दिसणार आहे, यामध्ये आमिर खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. करिनाने गरोदरपणात हा सिनेमा शूट केला होता. त्यावेळी करीनाचा बेबी बंप दिसत होता. निर्मात्यांनी पुन्हा निर्णय घेतला होता की ते व्हीएफएक्सद्वारे करिनाच्या बेबी बंप लपवतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.