Why did Nora Fatehi have to be brought on stretcher

 
Dainik Gomantak
मनोरंजन

'जलपरी' नोरा फतेहीला का आणाव लागल स्ट्रेचरवर?

दैनिक गोमन्तक

नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या बोल्ड फोटो आणि किलर डान्स स्टेप्समुळे नेहमीच चर्चेत असते. डान्सिंग क्वीन नोरा फतेही यावेळी सुपरस्टार गायक गुरू रंधावाच्या (Guru Randhawa) साथीने चाहत्यांचे होश उडवणार आहे. नोरा तिच्या गाण्यात 'जलपरी'च्या अवतारात दिसणार आहे. 'डान्स मेरी रानी' हे दोन्ही नवे म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार आहेत. मात्र, अभिनेत्रीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की तिला सेटवरून आणण्यासाठी स्ट्रेचरची मदत घ्यावी लागली. नोराला स्ट्रेचरवर पडलेले पाहून चाहतेही काळजीत पडले आणि विचारू लागले नेमकं झालं तरी का?

नोरा फतेही पंजाबी गायक गुरु रंधावा सोबत दुसऱ्यांदा स्क्रीनवर झळकणार आहे. 'डान्स मेरी रानी' हा नवीन म्युझिक अल्बम 21 डिसेंबरला रिलीज होणार आहेत. पण हे गाणे रिलीज होण्याआधीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानंतर चाहत्यांना नोराच्या तब्येतीची चिंता वाटू लागली आहे.

खरं, व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्ट्रेचरवर पडलेली दिसत आहे. म्युझिक अल्बमसाठी नोराने 'जलपरी'चा लूक केला होता. त्यामुळे तीला घट्ट कपड्यांमध्ये फिरणे कठीण झाले. याच कारणामुळे नोराला स्ट्रेचरवर झोपवून पाण्याबाहेर काढण्यात आले.

3 महिन्यांत तयार झाला ड्रेस

नोरा फतेहीच्या या ड्रेसबद्दल बोलायचे तर हा ड्रेस तयार करायला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला. नोराचा हा ड्रेस परदेशात तयार करण्यात आला आहे, ज्याचे वजन 15 किलो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याला बनवण्यासाठी सुमारे 3 महिने लागले आहेत, ज्याला परिधान करून हालचाल करणे खूप कठीण काम आहे. 'डान्स मेरी राणी' हे गाणं गुरु रंधवा आणि ज़हरा एस खान यांनी गायले आहे. हे गीत रश्मी विराग यांनी लिहिले असून तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा कोसळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

SCROLL FOR NEXT