Rakhi Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant : "तनु, तू माझं घर उद्ध्वस्त केलंस"! राखीने शाप दिलेली अभिनेत्री आहे तरी कोण?

अभिनेत्री राखी सावंतने आपल्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल करुन त्याला तुरुंगात धाडले आहे, पण याचं कारण ठरलेली अभिनेत्री आहे तरी कोण?

Rahul sadolikar

राखी सावंतने नुकतेच पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि घरगुती हिंसाचार सारखे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर त्यांनी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी आदिलला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राखीचे घर पूर्णपणे तुटले आहे. यासाठी ती एका मॉडेलला दोष देत आहे.

मॉडेल राखी सावंतने घर फोडल्याचा आरोप केला असून, तिचे नाव आहे निवेदिता चंदेल. निवेदिता स्वतःची ओळक एक अभिनेत्री अशीच सांगते. निवेदिता चंदेलने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. 

निवेदिताने नूरन सिस्टर्ससह अनेक मोठ्या गायकांसोबत काम केले आहे.निवेदिता चंदेलचे म्युझिक व्हिडिओ खूप लोकप्रिय आहेत. ती बहुतेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. सध्या इंडस्ट्रीत उभी राहण्यासाठी ती धडपडत आहे. 

Rakhi Sawant

निवेदिता चंदेल आपलं टोपण नाव तनु असे लिहिते. गेल्या अनेक दिवसांपासून राखी निवेदिताला तनू नावाने हाक मारताना दिसली होती.नुकताच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती म्हणतेय, "तनु, तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. जो माणूस आपल्या बायकोसोबत राहू शकला नाही, त्याचं काय होईल. मी तुला शाप देतो.

राखी सावंतने काही दिवसांपूर्वी निवेदिता चंदेलचा आदिल दुर्राणीसोबतचा फोटो शेअर केला होता. आदिलने स्वतः काढलेला तो सेल्फी होता. राखीने सांगितले होते की ती आदिलची नवीन गर्लफ्रेंड आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT