Virat Kohli Anushka Sharma Video Dainik Gomantak
मनोरंजन

विरुष्काची स्कूटरवरुन मुंबईत भटकंती, Video Viral

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आशिया कप 2022 मधून तो पुन्हा मैदानात उतरू शकतो. अलीकडेच कोहली अनुष्का शर्मासोबत मुंबईत स्कूटरवर फिरताना दिसला. कोहली आणि अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट आणि अनुष्का बऱ्याच लोकांचे आयडल आहेत. त्यांची लवस्टोरी, त्यांच्यातील बॅाडिंग, बऱ्याच कपल्सला प्रेरणादेणारी आहे. विराट आणि अनुष्का नेहमीच एकत्र वेळ घालवताना आपल्याला दिसतात. यावर चाहतेही अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का शर्माने शाहरूख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण या दोन फिल्मफेअर पुरस्कारांसाठीही नामांकन मिळाले आहे.

शनिवारी एका प्रोजेक्टच्या शूटला ते एकत्र दिसून आले, शूटनंतर हे कपल मुंबईतील मध बेटावर स्कूटर चालवताना दिसले. हा व्हिडिओ (Video) सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे. विराटने हिरवा शर्ट आणि काळी पँट घातली तर अनुष्काने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

दोघांनीही ब्लॅक-आउट व्हिझरसह पूर्ण चेहऱ्याचे हेल्मेट घातले आहे. पण याची खात्री त्यांच्या फोटोमुळे पटली. ज्या ड्रेसमध्ये विराट आणि अनुष्का यांनी फोटोसाठी पोज दिले आहेत. त्याच ड्रेसमध्ये व्हिडिओत स्कूटर चालवताना दिसत आहेत.

तसेच ,अनुष्का शर्मा तिच्या अपकमिंग चित्रपट ' चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) ची शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुष्का शेवटची 2018 मध्ये 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. 'चकदा एक्स्प्रेस' मधून अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांनी रूपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT