The Kashmir Files | ITA Awards 2022 |  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files : 'गोल्डन फिल्म' पुरस्काराने सन्मानित; दिग्दर्शकांनी शेअर केला फोटो

ITA Awards 2022: 'द काश्मीर फाइल्स' हा काश्मिरी पंडितांवर आधारित चित्रपट रिलीज झाल्यापासून हा खूप चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार' (ITA Awards 2022) सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. 

  • या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले
    यावर्षी रिलीज झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबाबत बराच वाद झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला तर काही लोकांनी याला अपप्रचार म्हणत टीका केली. विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटाने आपल्या मनोरंजक कथेने भारतीय चित्रपटसृष्टीत मोठा प्रभाव निर्माण केला आहे. अग्निहोत्रीला दिग्दर्शक म्हणूनही भरभरून दाद मिळाली आहे. सध्या, या चित्रपटाला इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स (ITA) मध्ये भारतीय चित्रपटातील गोल्डन फिल्म म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले, "#TheKashmirFiles ला गोल्डन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल @TheITA_Official यांचे आभार... हा लोकांचा सिनेमा आहे. मी फक्त माध्यम आहे... हा पुरस्कार काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करतो". 

विवेक अग्निहोत्री यांनी पुढे लिहिलं आहे,"भारतीय सिनेमाचा गोल्डन फिल्म म्हणून सन्मान होणं ही आनंदाची बाब आहे. #TheKashmirFiles ला मिळालेला हा पुरस्कार अमानुष अत्याचारांचा सामना करावा लागलेल्या काश्मीर खोऱ्यातील पंडितांना समर्पित करण्यात येत आहे."

दरम्यान, गोव्यात (Goa) झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'ला 'प्रचार' म्हटले होते. यावरून बराच वाद झाला होता. 'द कश्मीर फाइल्स' व्यतिरिक्त, विवेक अग्निहोत्री लवकरच 15 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार्‍या कोराना महामारीवरील 'द व्हॅक्सिन वॉर' या नवीन चित्रपटाची तयारी करत आहे. दिग्दर्शकाची पत्नी पल्लवी जोशी निर्मित हा चित्रपट 10 हून अधिक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT