Vishal Bhardwaj Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan: "शाहरुखसोबत काम करणार का?" प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिले उत्तर; म्हणाला 'तो आवडत नाही असं..'

Vishal Bhardwaj Shah Rukh Khan: आपल्या वेगळ्या कथनशैलीने प्रेक्षकांवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक विशाल भारद्वाज पुन्हा चर्चेत आले आहेत.

Sameer Panditrao

आपल्या वेगळ्या कथनशैलीने प्रेक्षकांवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक विशाल भारद्वाज पुन्हा चर्चेत आले आहेत. अजय देवगण, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्यासोबत कल्ट चित्रपट देणाऱ्या विशाल यांनी अद्याप बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान यांच्यासोबत काम केलेले नाही, ही बाब चाहत्यांना नेहमीच खटकत आली आहे.

सध्या त्यांचा 'ओ रोमिओ' हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने ते प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान एका मुलाखतीत त्यांना शाहरुख खानसोबत काम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत सांगितले की, “असं होणं गरजेचं आहे. मी वर्षातून अनेकदा शाहरुखला विविध कथांसाठी संपर्क करतो. तो नेहमी माझ्या संदेशांना प्रतिसाद देतो. तो अत्यंत नम्र आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे.”

विशाल यांनी खुलासा केला की ‘ओ’रोमिओ’च्या निर्मितीदरम्यानही त्यांनी शाहरुखला एका नव्या चित्रपटाची कथा पाठवली आहे. “प्रत्येकाला शाहरुख आवडतो. त्याच्यात काहीतरी खास आहे, जे त्याला शाहरुख खान बनवतं. आमच्यात एक चित्रपट व्हायलाच हवा,” असे ते म्हणाले.

चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे. विशाल भारद्वाज आणि शाहरुख खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर कधी झळकणार, याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT