Vikram Gokhale & Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Vikram Gokhale Death: विक्रम गोखलेंच्या वाईट काळात बिग बींचा मदतीचा हात; हा किस्सा माहित आहे का?

Vikram Gokhale & Amitabh Bachchan: बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जाणारे विक्रम गोखले आता या जगात नाहीत.

दैनिक गोमन्तक

Vikram Gokhale Death: बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जाणारे विक्रम गोखले आता या जगात नाहीत. गेल्या काही दिवसांपासून गोखलेंना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण, आता विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ते यकृताशी संबंधित गंभीर आजाराने त्रस्त होते आणि शरीराचे इतर भागही नीट काम करत नव्हते. विक्रम गोखले यांनी अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली. मात्र कठीण प्रसंगी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांना साथ दिली.

मला सरकारकडून घर मिळाले

विक्रम गोखले हे अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अग्निपथ' चित्रपटात दिसले होते. त्यांनी एका मुलाखतीत बिग बींसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते. यादरम्यान विक्रम गोखले यांनीही अमिताभ बच्चन यांनी संघर्ष करत असताना त्यांना साथ दिल्याचा खुलासा केला होता. ते म्हणाला होते की, ''जेव्हा मी या इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला. मी आर्थिक संकटातून जात होतो आणि मुंबईत (Mumbai) घर शोधत होतो. मात्र, अमिताभ बच्चन यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पत्र लिहिले. त्यांच्या शिफारशीवरुन मला सरकारकडून घर मिळाले. मी लिहिलेले पत्र अजूनही माझ्याकडे आहे.''

या चित्रपटांमध्ये काम केले

विक्रम गोखले हे सिनेविश्वातील एक उत्तम अभिनेते होते. त्यांनी केवळ चित्रपट आणि टीव्हीच नव्हे तर थिएटरमध्येही भरपूर काम केले. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परवाना'मध्ये ते पहिल्यांदाच चित्रपटात दिसले. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातही ते दिसले होते. या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 'अग्निपथ', 'दिल से', 'भूल भुलैया', 'दे दना दान', 'हिचकी', 'मिशन मंगल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

विक्रम गोखले यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपट जगताशी निगडीत

विक्रम गोखले यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपट जगताशी निगडीत आहे. विक्रम गोखले यांच्या आजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेविश्वातील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. त्यांची आजी कमलाबाई गोखले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बालकलाकार म्हणून काम केले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT