Vikram Gokhale Health Update: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती पुन्हा खालावली

Vikram Gokhale Latest Health Update: विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.
Vikram Gokhale
Vikram Gokhale Dainik Gomantak
Published on
Updated on

विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होता. पण त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली होती. पण आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे. 

मेडिकल बुलेटिन नुसार, विक्रम गोखले अजूनही व्हेंटीलेटरवर असून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. तसेच त्यांना पुन्हा रक्तदाबाची औषधे चालू केली आहेत. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. एकीकडे त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असताना दुसरीकडे त्यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीने या बातम्या फेटाळून लावल्या.

Vikram Gokhale
Maya Heble IFFI 2022: ‘फिक्सेशन’मुळे गोव्यात येण्याची मिळाली संधी

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रंगभूमी, सिनेमा, मालिका, वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली आहे. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षक आजही विसरू शकत नाहीत. आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com