Vikram Gokhale Dainik Gomantak
मनोरंजन

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले 'या' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Vikram Gokhale Passed Away: जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड आणि टीव्हीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अनेक दिवस ते रुग्णालयात दाखल होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विक्रम त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात असे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले आहेत.

  • अभिनयाचा वारसा लाभला होता

बॉलिवूड (Bollywood) आणि छोट्या पडद्यासोबतच विक्रम यांनी मराठी रंगभूमीवरही नाव नोंदवले आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते होते. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटांच्या पहिल्या अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. याशिवाय त्यांची आजी कमलाबाई गोखले याही चित्रपटांशी संबंधित होत्या. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली बालकलाकार म्हणून काम केले होते.

  • विक्रम गोखले या चित्रपटांमुळे आले प्रसिध्दीच्या झोतात
    विक्रम गोखले यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. टीव्हीवरही आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'परवाना' या चित्रपटातून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. स्वर्ग नरक, इन्साफ, अग्निपथ, खुदा गवाह, अधर्म, तडीपार, आंदोलन, हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया, दे दाना दान, बँग बँग, अय्यारी, हिचकी आणि मिशन मंगल या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.

  • अनेक मालिकांमध्ये केले उत्तम काम

अनेक मालिकामध्ये ही त्यांनी काम केले आहेत. त्यांनी उडान, इंद्रधनुष, क्षितिज ये नही, संजीवनी, जीवन साथी, सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन, शिव महापुराण आणि अवरोध: काम केले. अभिनयासोबतच विक्रम गोखले यांनी दिग्दर्शक म्हणून 2010 साली 'अघात' हा मराठी चित्रपट बनवला. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 2013 साली आलेल्या 'अनुमती' या मराठी चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT