Vijay Tamanna Love Story Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay Tamanna Love Story : विजय - तमन्नाच्या नात्याची बातमी खरी ठरलीच ... प्रेमाची कबूली दिलीच

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या नात्याच्या अफवा नसुन त्या बातम्या खऱ्याच होत्या अशी बातमी आता समोर आली आहे.

Rahul sadolikar

चला बॉलीवूडमधुन एका अफेअरची बातमी कन्फर्म झाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन विश्वात बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेंटिगच्या बातम्या वाऱ्या सारख्या पसरल्या. या दोघांना बऱ्याच वेळासोबत स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या नात्याची चर्चा होऊ लागली.

मात्र दोघीही कालारांनी याबाबत बोलण टाळल होतं. ना तमन्नाने याबद्दल पृष्टी केली ना विजयने. मात्र विजयच्या दहाड सिरिजच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षी आणि इतर कलाकारांनी विजला तमन्नाच्या नावाने चिडवल्याने या अफवांना आणखीच उधाण आलं होतं.

नात्यावर शिक्कामोर्तब

आता तमन्ना भाटियाने आता तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत विजय वर्मासोबतच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तिला विजयबद्दल विचारल्यावर तिनं तिच्या उत्तरानंच सगळं काही सांगितलं.

तमन्नाने एका मुलाखतीत विजय वर्मासोबतच्या नात्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी विजयसाठी असे काही बोलले की त्यांचे वक्तव्य काही मिनिटांतच व्हायरल झाले.

एकत्र काम करण्याचं काहीही कारण असु शकतं

फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना भाटियाने डेटिंगबद्दल खुलासा केला आहे. तमन्ना म्हणाली, 'मला वाटत नाही की तुम्ही फक्त त्यांच्यासोबत काम केल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होतात.

एखाद्यासाठी काहीतरी वाटण्याची भावना वेगळी असते. त्यामुळेच एकत्र काम करण्याचं काही कारण असू शकतं, असं मला वाटत नाही.

हो विजय स्पेशल व्यक्ती आहे

तमन्ना म्हणाली की, 'होय, विजय अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत मी पुढे काही प्लॅनिंग करू शकते. माझा त्याच्यासोबतचा संबंध खूप खास आहे. तो अशी व्यक्ती आहे ज्याची मी काळजी घेते आणि हो, तो या क्षणी माझं आनंदाच ठिकाण आहे. होय, ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एकमेकांच्या जवळ कसे आलो.

त्याला माझ्या गोष्टी समजतात

तमन्ना पुढे म्हणते की, 'भारतात अशीही एक समस्या आहे की एका मुलीला जोडीदारासाठी तिचे संपूर्ण आयुष्य बदलावे लागते. त्या माणसासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. पण तो तसा नाही. त्याला माझे जीवन आणि गोष्टी पूर्णपणे समजतात.

तमन्ना आणि विजय एकत्र पडद्यावर

तमन्ना आणि विजय वर्मा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत . 'लस्ट स्टोरीज 2' नावाची ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

Panaji Smart City: पणजी स्मार्ट सिटीचे 92.25% काम पूर्ण; Watch Video

Team India Squad T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा; ईशान किशनचं कमबॅक, गिलचा पत्ता कट

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

SCROLL FOR NEXT