Shahrukh Shares Cat's Video: या सुंदर मांजरालाही लागले 'पठान'चे वेड

अभिनेता शाहरुख खानने पठानचं टायटल साँग पाहणाऱ्या एका मांजराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Shahrukh Shares Cat's Video
Shahrukh Shares Cat's VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Shahrukh Shares Cat's Video: अभिनेता शाहरुख खानच्या पठान चित्रपटाने जेवढा वाद निर्माण झाला तेवढा कुठल्याच चित्रपटाचा झाला नसेल.

अगदी शाहरुख खानवर गुन्हा नोंद करण्यापर्यंत प्रकरण ताणलं गेलं होतं ;पण काही काळाने सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या दुरुस्त्या करुन हा चित्रपट रिलीज करण्यात आला.

पठानने बॉक्सऑफिसवर केलेली कमाई सगळ्यांचे डोळे दिपवणारी होती. चित्रपटाला देशभरातून नव्हे तर जगभरातून मिळालेला प्रतिसाद खूपच प्रचंड म्हणता येईल असा होता. अजुनही पठानची जादू ओसरलेली नाही.

माणसांसोबत प्राण्यांनाही पठानने वेड लावले असं म्हणता येईल असाच एक व्हिडीओ स्वत: किंग खानने शेअर केला आहे.

पठान गाण्याचं मांजराला लागले वेड

शाहरुखने एका ट्विट्टर युजरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्या युजरने 'सर माझं मांजर तुमच्यावर प्रेम करतं असं मला वाटतं' अशी कॅप्शन दिली आहे.

या व्हिडीओत ते मांजर शाहरुखच्या 'झुमे जो पठान' या गाण्याच्या व्हिडीओ पाहण्यात गुंग झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असुन नेटीजन्सच्या वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर येत आहे.

शाहरुख म्हणतो

शाहरुख खानने हा व्हिडीओ शेअर केला असुन तो लिहितो 'माझ्याकडूनही प्रेम. आता काही कुत्र्यांचीही गरज आहे ज्यांना माझे चित्रपट आवडतील आणि मी सेट होईन.

स्वत: शाहरुखने हा व्हिडीओ शेअर केल्याने त्या यूजरचा आनंद गगनात मावत नसेल हे नक्की.

Shahrukh Shares Cat's Video
Kazan Khan Passes Away: साऊथचा हा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड..

शाहरुखचं आस्क मी सेशन

शाहरुख सोशल मिडीयावर बराच सक्रिय असतो. ट्विट्टरवर शाहरुखने 'आस्क मी' सेशन सुरु केले असुन त्याद्वारे तो चाहत्यांशी संवाद साधत असतो, कित्येक फॅन्सच्या विनोदी प्रश्नांना शाहरुख त्याच शैलीत उत्तरं देत असतो.

काही फॅन्स शाहरुखची मजाही करताना दिसतात. पठानच्या वादाच्या काळातही शाहरुख आपल्या या सेगमेंट आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com