vijay deverakonda samantha ruth prabhu Dainik Gomantak
मनोरंजन

सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा झळकणार रुपेरी पडद्यावर

विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील दोन मोठे स्टार झळकणार रुपेरी पडद्यावर

दैनिक गोमन्तक

विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील दोन मोठे स्टार आहेत. आता हे दोन्ही स्टार्स एकाच चित्रपटात दिसणार आहेत. होय, दिग्दर्शक शिव निर्वाण यांच्या आगामी चित्रपटात चाहत्यांना या दोघांची जोडी पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिवाने या दोन्ही कलाकारांना चित्रपटात कास्ट केले आहे. शीर्षकहीन प्रकल्पाचे आज पूजन समारंभाने शुभारंभ करण्यात आला आहे. हा चित्रपट एक सुंदर कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार आहे.

हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा असेल ज्याचे शूटिंग काही काळानंतर काश्मीरमध्ये सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटातील काही प्रमुख दृश्ये विजय आणि समंथासोबत काश्मीरमध्ये शूट केली जाणार आहेत. या चित्रपटात (Movie) दाखवण्यात आलेल्या प्रेमकथेची पार्श्वभूमी लष्करावर आधारित असेल, असे सांगितले जात असले तरी अधिक माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात विजय एका आर्मीमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे.

विजय देवरकोंडा याच वर्षी बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे. त्याचा 'लिगर' हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. त्याचवेळी समंथाविषयी सांगायचे तर ती गेल्या वर्षी 'फॅमिली मॅन 2' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये राजीच्या भूमिकेतील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर समंथा 'पुष्पा' मधील एका आयटम नंबरमध्ये दिसली होती जे खूप हिट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT