Vijay Deverakonda And Samantha Ruth Prabhu Dainik Gomantak
मनोरंजन

'kushi' मध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत झळकणार विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडाच्या आगामी 'खुशी' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

स्टार विजय देवरकोंडाचे (Vijay Deverakonda) चाहते त्याच्या आगामी 'लिगर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विजयचा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे, पण त्याआधी विजयच्या आगामी 'खुशी' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे या चित्रपटात विजय देवरकोंडा साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्यासोबत दिसून येणार आहे. विजयसोबत या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला. दोघांच्या फर्स्ट लूकचे मोशन पोस्टरही चित्रपट निर्मात्यांनी यूट्यूब चॅनलवर चाहत्यांसाठी शेअर केले आहे. (Vijay Devarakonda will star alongside Samantha Ruth Prabhu in Kushi)

शिव निर्वाण लिखित आणि दिग्दर्शित 'खुशी' या चित्रपटाचे मोशन पोस्टर यूट्यूबवर शेअर करण्यात आले असून त्याची सुरुवात आकाशात उडणारा गुलाबी रंगं असा आहे. यानंतर त्यांचे गठबंधन दाखवले जाते आणि मुख्य म्हणजे हे गठबंधन कोणत्याही विवाह विधीबद्दल नाहीये. विजय आणि समंथा एकाच जागी बसलेले आहेत. विजयने शर्ट आणि डेनिम्स परिधान केले आहे आणि सामंथाने साडी नेसलेली आहे. तो विजयचा शर्ट आणि सामंथाच्या साडीशी गठबंधन केलेला आहे. पोस्टरमध्ये सामंथा विजयकडे अतिशय प्रेमाने पाहत असल्याचे आपल्याला दिसत आहे. तर दुसरीकडे, विजय पूर्ण स्टाईलीश लुक दाखवत आहे.

विजय आणि समंथा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर 'खुशी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटातील सामंथाचा फर्स्ट लूक रिलीज करताना विजयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आनंद, प्रेम, कुटुंब आणि बाँडिंगचा विस्फोट. 'खुशी' 23 डिसेंबरला तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये जगभरात रिलीज होईल. या ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या आगमनावेळी सर्वत्र प्रेम पसरवे.

'खुशी' चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना चाहत्यांना दिसून येणार आहेत. या सुपरस्टार्सला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विजय आणि समंथा या दोघांची फॅन बेस वेगळा वेगळा आहे. तर या दोघांची जोडी फ्रेश आहे, त्यामुळे यावेळेस काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे, अशी आशा प्रेक्षकांना आहे, तर हा चित्रपट यावर्षी 23 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

सध्यातरी विजय देवरकोंडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'खुशी' चित्रपटापूर्वी प्रेक्षकांना तो 'लायगर' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. विजय लिगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात विजयसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे () देखील दिसून येणार आहे. करण जोहर निर्मित आणि पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑगस्टला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT