बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) आपल्या जबरदस्त अॅक्टिंगने चाहत्यांचे मन जिंकले आहे. तीचे चित्रपट कथा देखील निवडक आणि जबरदस्त असतात. त्याने केलेल्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाने त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने 2015 मध्ये 'मसान' सोबत आपली छाप पाडली आणि 'रमन राघव 2.0', 'राझी', 'उरी' आणि अगदी अलीकडे 'सरदार उधम' यांसारख्या प्रोजेक्ट्ससह त्याचा सिलसिला सुरू ठेवला. विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया जबरदस्त चित्रपट कोणती आहेत. (Vicky Kaushal Birthday Special News)
*संजू
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ' संजू ' हा सिनेमा बॉलिवूड स्टार संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत आहे. विकी या चित्रपटामध्ये रणबीरचा चांगला मित्र म्हणून काम करतो परंतु त्याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज केले.
* राझी
राझी या चित्रपटामध्ये (Movie) आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात विकी कौशलने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.
* उरी
या देशभक्तीपर चित्रपटाने प्रत्येक भारतीयाचे हृदय भारतीय सैन्याबद्दल अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते. विकीच्या 'जोश, शौर्य आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाला इंडस्ट्रीतील प्रत्येक प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला होता.
* मनमर्जियां
मनमर्जियां विकिला अगदी वेगळ्या भूमिकेत दाखवतो.या चित्रपटामध्ये विकीने वेगळी हेयर स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्ससह एक मजेदार डीजेची भूमिका पार पडली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित, आणि तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट अमृतसरमध्ये सेट केलेला एक रोमँटिक ड्रामा आहे.
* मसान
नीरज घायवान दिग्दर्शित मसान या चित्रपटात रिचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी आणि पंकज त्रिपाठी आहेत. एका छोट्या शहरात आधारित, हा चित्रपट विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि जातीयवादी रूढीवादी कलंक तोडण्याचा प्रयत्न करतो.या चित्रपटामध्ये विकीची जबरदस्त भूमिका पाहायला मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.