Vicky Katrina Death Threat Dainik Gomantrak
मनोरंजन

Vicky Katrina Death Threat: विकी अन् कतरिनाला जिवे मारण्याच्या धमक्या; विकीची पोलिसात धाव

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड कलाकार विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी विकीने मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आदित्य राजपूत नावाच्या व्यक्तीवर सोशल मीडियावर धमक्या दिल्याचा आरोप आहे. विकी कौशलच्या तक्रारीवरून पोलीस आदित्यचा तपास करत आहेत. (Vicky Katrina Death Threat news)

विकी कौशलच्या (Vicky kaushal ) तक्रारीवरून पोलिसांनी कलम ५०६(२), ३५४(डी) आयपीसी कलम ६७ आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. विक्की कौशलने इंस्टाग्रामवर एका मेसेजद्वारे एक व्यक्ती त्याला धमकावत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आरोपी कतरिना कैफवर (katrina kaif) नजर ठेवून तिला धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, विकी कौशल आणि कतरिना कैफचे गेल्या वर्षी 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. अलीकडेच दोन्ही स्टार्स त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते. 16 जुलै रोजी कतरिनाने तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला. याचे अनेक खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

एखाद्या स्टारला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच अभिनेता सलमान खानला एका पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. याप्रकरणी सलमान खानच्या (Salman Khan) वतीने पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी सलमानने स्वतः मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. वृत्तानुसार, त्याने बंदूक परवान्यासाठी अर्जही केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT