Katrina Kaif News, Vicky Katrina wedding secrets, Vicky and Katrina News Updates Instagram/@Katrina Kaif
मनोरंजन

Vicky-Kat च्या लग्नाशी संबंधित हे सत्य तुम्हाला माहीतयं का?

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाशी संबंधित एक खास बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड पॉवर कपल कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचे ग्रँड वेडिंग चाहत्यांना अजूनही स्मरणात आहे. बॉलीवुडचे (Bollywood) दोन सुपरस्टार कतरिना आणि विकी यांचे लग्न पाहणे चाहत्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हते. राजस्थानातील सवाई माधोपुरमध्ये अनेक दिवस या दोघांच्या लग्नाचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. कतरिना आणि विकी यांची गणना इंडस्ट्रीमधील सर्वात रोमॅंटिक जोडप्यामध्ये केली जाते. पण आता दोघांच्या लग्नाबाबत एक अशी बातमी समोर आली आहे, जी एकूण तुम्ही थक्क व्हाल. (Vicky Katrina wedding secrets)

सध्या सोशल मिडियावर (Social Media) कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्ना संबंधित एक बातमी समोर आली आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतरही कतरिना आणि विकीने कायदेशीर लग्न केले नव्हते. असे मिळालेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कतरिना (Katrina Kaif) आणि विकीने कायदेशीर लग्न केले. मिळालेल्या वृत्तानुसार कतरिना आणि विकीने (Vicky Kaushal) रितीरिवाजांनुसार लग्न केले होते, मात्र या दोघांनी लग्नाची नोंदणी केली नव्हती. त्यांनी 19 मार्च रोजी कोर्टात कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये लग्नाची प्रक्रिया पूर्ण केली.

कतरिना आणि विकीचे रॉयल लग्न

कतरिना आणि विकीने राजस्थानमध्ये 9 डिसेंबरला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत रॉयल लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्न झाल्यापासून दोघेही प्रत्येक सण आनंदात साजरा करता आहेत.अलीकडेच सोशल मीडियावर कतरिनाने होळीचे फोटो शेअर केले आहेत.कतरिना सोशल मिडियावर नेहमीच त्या दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prithvi Shaw Double Century: 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Rohini Kalam: क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT