Shabaash Mithu poster, Shabaash Mithu Teaser News, Shabaash Mithu Movie News, Taapsee Pannu Latest Movie News Twitter
मनोरंजन

Shabaash Mithu Teaser: भारतीय क्रिकेटची गेम चेंजर मिताली राज

तापसी पन्नूच्या 'शाबाश मिठू' या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मिडियावर धूम

दैनिक गोमन्तक

Shabaash Mithu Teaser OUT: तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) 'शाबाश मिठू' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याबरोबर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. टीझरमध्ये तापसी भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी प्रेक्षक तिचा लूक पाहून अभिनेत्रीला मिताली राज असल्याचेही म्हणत आहे. (Shabaash Mithu Movie News)

तिच्या इंस्टाग्रामवर 'शाबाश मिठू' चा टीझर शेअर करताना, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये, 'या जेंटलमॅन्स खेळात, तिने इतिहास लिहिण्याची तसदी घेतली नाही तर तिने स्वतःची एक वेगळी कहानी लिहिली!' या चित्रपटात तापसीसोबत अभिनेता विजय राज महत्त्वाच्या भूमिकेत आहे. वायाकॉम 18 स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचे दिग्दर्शक सृजित मुखर्जी आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

टीझरमध्ये तापसी दिसतेय खास

या टीझरमध्ये 56 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की तापसी मितालीच्या लूकमध्ये खेळाच्या मैदानात प्रवेश करते आणि क्रिकेटच्या मैदानात बसलेले प्रेक्षक तिरंगा ध्वज घेऊन तिचे स्वागत करतात. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला, संगीत आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांमध्ये, क्रिकेट कमेंटेटर मिताली राजची म्हणजे तापसीची खास पद्धतीने ओळख करून देत आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि त्यांनी केलेल्या विक्रमांचा उल्लेख या वेळी ते करून देतात. निळ्या रंगाच्या जर्सीत तापसी खूपच सुंदर दिसत आहे. तापसी पन्नूचा टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर हरलीन सेठी, शगुन पन्नू, रकुल प्रीत आणि अशा अनेक सेलिब्रिटी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचवेळी चाहते मिताली राज म्हणून तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तापसीच्या पोस्टला 14 लाखांहून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला आहे.

तापसीच्या आगामी चित्रपटांची यादी

आता तापसीच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर शाबाश मिठ्ठू नंतर लवकरच तापसी पन्नू 'ब्लर' या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. याशिवाय तापसीच्या आगामी चित्रपटांमध्ये दोबारा, वो लड़की कहां है, तमिळ चित्रपट जन गण मन, एलियन आणि मिशन इम्पॉसिबल या चित्रपटांचा समावेश आहे. या आधी तापसी लूप लपेटा आणि रश्म‍ि रॉकेटमध्ये दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

SCROLL FOR NEXT