Birthday Special: ध्वनी भानुशालीच्या टॉप 5 गाण्यांनी, वाढवला यूट्यूबचा पारा

ध्वनी भानुशालीने सर्वात तरुण भारतीय पॉप स्टार म्हणून ओळख निर्माण केली आहे.
Dhvani Bhanushal
Dhvani BhanushalInstagram/@Dhvani Bhanushal
Published on
Updated on

ध्वनी भानुशालीने संगीत क्षेत्रात फार कमी वेळात आपले स्थान निर्माण केले आहे. आज ती 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने लहान वयातच संगीत क्षेत्रात प्रवेश केला. ध्वनीचे 'वास्ते' हे गाण यूट्यूबवर खूप प्रसिद्ध झाले आणि सर्वात तरुण भारतीय पॉप स्टार म्हणून ओळख निर्माण केली. ध्वनीच्या (Dhvani Bhanushal) वाढदिवसानिमित्त तीचे 5 प्रसिद्ध गाण्याबद्दल माहिती पाहूया .

* दिलबर-दिलबर

हे गाण 'सत्यमेव जयते' या चित्रपटमधील आहे. हे गाण ध्वनीने नेहा कक्कर आणि इक्का सिंग यांच्यासोबत गायले होते. हे गाण यूट्यूबवर इतके वेळा पहिले गेले आहे, ज्याचा रेकॉर्ड तोंडाने कठीण आहे. या गाण्यातून 24 वर्षीय ध्वनीला खरी ओळख मिळाली.

* वास्ते

हे गाण यूट्यूबवर सर्वाधिक आवडले गेलेले म्युझिक व्हिडिओ आहे. 20196 मध्ये लाँच झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 1 बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे संगीतही तनिष्क बागचीने दिले असून त्यांचे बोल अराफत महमुद यांनी लिहिले आहेत.

Dhvani Bhanushal
Ranveer Singh चा ‘गली बॉय’ रॅपर धर्मेश परमारचं निधन

* इशारे तेरे

या गाण्याला ध्वनीने आणि गुरु रंधावाने आपला आवाज दिला. हे गाण 2018 मध्ये रिलीज झाले होते. आतापर्यंत या गाण्याला 569 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे.

* बेबी गर्ल

इशारे तेरे या गाण्यानंतर त्यांनी बेबी गर्ल हे गाण सोबत गायले. या गाण्याला देखील चाहत्यांची पसंती मिळाली. आतापर्यंत या गाण्याला 295 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. हे गाण रेमो डिसूझाने दिग्दर्शित केले आहे.

* लेजा रे

उस्ताद सुलतान खान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या लेजा रे गाण्याचा रिमेक ध्वनी भानुशालीने गायले आहे. लोकांना हे गाण खूप आवडले. या गाण्याला नवीन संगीत आणि शब्दामध्ये गायले गेले. या गाण्याला म्युझिक तनिष्क बागची यांनी दिले असून रश्मी विराग यांनी गीते लिहिली आहेत.या गाण्याला 762 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com