Vikram Gokhale  Dainik Gomantak
मनोरंजन

Vikram Gokhale Health Update: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, पुण्यात उपचार सुरू

विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Pramod Yadav

Vikram Gokhale Health Update: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही दिवसापासून ते रुग्णालयात दाखल आहेत. विक्रम गोखले रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत असल्याची माहिती मिळत आहे. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

विक्रम गोखले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. काही दिवसांआधी स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अजूनही त्यांची प्रकृती चितांजनक असल्याचे एएनआय यावृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठीसह बॉलिवूडमध्ये (Many Marathi And Bollywood Movies) देखील अनेक भूमिका केल्या आहेत. रंगभूमीवर देखील त्यांचा दबदबा होता. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

SCROLL FOR NEXT