Veteran Actor Ravindra Mahajani Passed away  Dainik Gomantak
मनोरंजन

Actor Ravindra Mahajani Death: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; बंद घरात आढळला मृतदेह

दोन ते तीन दिवसांपूर्वी महाजनी यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

Actor Ravindra Mahajani Death: देखणे, रुबाबदार, सालस व्‍यक्‍तिमत्त्‍व; सहजसोपा अभिनय अशा नानाविध पैलूंच्‍या जोरावर १९७५ पासून तीन दशके मराठी चित्रपटसृष्‍टीवर गारुड निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र ह. महाजनी (७४) यांचे आकस्मिक निधन झाले.

ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी महाजनी यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली.

रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावचा. त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. रवींद्र यांचे बालपण मुंबईत गेले. अभिनयाची त्‍यांना प्रचंड आवड होती. खालसा महाविद्यालयामध्ये कला शाखेतून पदवीधर झाल्‍यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला.

त्‍यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावले’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे चित्रपटही गाजले. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. सन १९९० नंतर चरित्र भूमिका, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला.

२०१५ नंतर त्यांनी ‘काय राव तुम्ही’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, पानिपत अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. महाजनी यांच्‍या निधनाच्‍या वृत्ताने जुन्‍या पिढीतील अनेकांना धक्‍का बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT