Ravindra Peepat Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Ravindra Peepat Passes Away: 'वारिस' फेम दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Ravindra Peepat Passes Away: याशिवाय 'कैद में है बुलबुल' आणि 'घर आया परदेसी' यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.

दैनिक गोमन्तक

Ravindra Peepat Passes Away: बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक रवींद्र पीपत यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. ते काही काळ आजारी होते. मिळालेल्या माहीतीनुसार त्यांना कॅन्सर होता.

त्यांनी 'वारीस' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यात स्मिता पाटील, राज बब्बर, अमृता सिंग यांसारखे कलाकार होते. याशिवाय त्यांनी 'लावा' चित्रपट देखील दिग्दर्शित केला आहे. ज्यामध्ये डिंपल कपाडिया, आशा पारेख आणि राज बब्बर दिसले होते.

रवींद्र पीपत यांनी रणधीर कपूर, पूनम ढिल्लन स्टारर 'बीवी ओ बीवी' या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे. 'पंजाब बोल्दा' हा पंजाबी चित्रपटही त्यांनी बनवला. 2012 मध्ये त्याने नीरू बाजवासोबत 'पता नहीं रब कहदियां रंगन च राजी' दिग्दर्शित केला होता. याशिवाय 'कैद में है बुलबुल' आणि 'घर आया परदेसी' यांसारख्या चित्रपटां( Movie )साठी ते ओळखले जातात.

टीव्ही मालिकामध्ये योगदान

रवींद्र पीपत यांनी 'वंश' या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शनही केले आहे. हा शो 1995 मध्ये प्रसारित झाला होता. याशिवाय त्यांनी 'काश आप हमारे होते', 'अपनी बोली अपना देश'ही लेखन केले होते. लेखन आणि दिग्दर्शनात त्यांचे नाव मोठे होते.

रवींद्र पीपत यांनी 2009 मध्ये पंजाबी इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यांनी तिथे स्वतःचे नाव कमावले होते. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT