Urmila Matondkar Dainik Gomantak
मनोरंजन

Urmila Matondkar: माझ्याशी नेपोटिझमबद्दल बोलू नका, असं का म्हणाली उर्मिला?

Urmila Matondkar: त्या दिवसांना आठवत उर्मिलाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर ही बॉलीवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. नुकतीच तिच्या सत्या या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या काही काळापासून उर्मिला चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही ती नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

सत्या चित्रपटाला 25वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसांना आठवत उर्मिलाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. फेवरीटीझम आणि भाऊबंधकी यावर आपले मत व्यक्त केले आहे. या जबरदस्त चित्रपटाला कोणताही पुरस्कार न मिळाल्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मनोज बाजपेयी, परेश रावल, शेफाली शाहसह आणि काही दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केले होते. इतकेच नाही प्रेक्षकांच्या मोठ्या प्रतिसादासहित बॉलीवूडमध्येही सत्याचे मोठे कौतुक झाले होते.

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटात उर्मिला मातोंडकार यांनी विद्याची भूमिका निभावली होती. आपल्या भूमिकेशी निगडीत उर्मिलाने काही फोटो शेअर करत नेपोटिझमवर तिखट भाषेत भाष्य केले आहे.

फोटो शेअर करत ती म्हणते- सत्या ला 25वर्षे पूर्ण झाले. त्यावेळी ग्लॅमरस करिअरच्या शिखरावर असतानादेखील मी या चित्रपटात एका साध्याभोळ्या विद्याची भूमिका निभावली होती. पण या इतक्या दमदार चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही.

पुरस्कार दूरची गोष्ट आहे मात्र साधे नॉमिनेशनदेखील नाही मिळाले. त्यामुळे शांत राहा आणि माझ्याशी नेपोटिजमबद्दल काहीही बोलू नका.

दरम्यान, उर्मिला मातोंडकरने सत्या', 'कौन' आणि 'एक हसीना थी' या चित्रपटात हटके भूमिकांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आता तिने शेअर केलेल्या पोस्टमधून ती नेपोटिझमच्या मुद्द्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT