Urfi Javed Dainik Gomantak
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेदने शेअर केला आजोबांचा फोटो, म्हणाली...

उर्फी जावेदने तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेचा विषय असते.

दैनिक गोमन्तक

Urfi Javed Grandfather Photo: अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन सेन्समुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. अनेकदा उर्फी तिच्या सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करते ज्यामुळे सगळेच हैराण होतात.

उर्फी जावेद ही लेखक-अभिनेते जावेद अख्तर यांची नात असल्याचे अनेकदा म्हटले गेले होते. काहींनी तर थेट उर्फीला देखील या संबंधित प्रश्न केले होते. पण आता स्वतः उर्फीनेच एक फोटो शेअर करत याचे उत्तर दिले आहे. यावेळी देखील उर्फीचा फनी अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. आता उर्फीने तिच्या सोशल मीडियावर जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार उर्फी जावेद नुकतीच एका फॅशन शोच्या निमित्ताने दिल्लीत आली होती. जिथे तिची भेट ज्येष्ठ अभिनेते-लेखक जावेद अख्तर यांच्याशी झाली. उर्फीने इंस्टाग्रामवर जावेद अख्तरसह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये (Photo) उर्फीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर जावेद यांनी राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये दोघेही हसतांना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना उर्फी जावेदने एक मजेशीर कॅप्शन देऊन जावेद अख्तर यांचे कौतुकही केले आहे.

Urfi javed

उर्फीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने लिहिले की, ‘अखेर मी आज माझ्या आजोबांना भेटले. ते एक लीजेंड आहेत. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी बरेच लोक पहाटेपासून रांगेत उभे होते, पण त्यांनी कुणालाही नाही म्हटले नाही. सगळ्यांशी त्यांनी हसत हसत गप्पा मारल्या. ते खूप ग्रेट आहेत आणि त्यांना भेटून मला आनंद झाला.’

जावेद अख्तर हे उर्फी जावेदचे आजोबा असल्याचे अनेकदा बोलले जाते. स्वतः उर्फीने बऱ्याच वेळा यावर स्पष्टीकरण देखील दिले आहे. उर्फी आणि जावेद अख्तर यांच्यात कोणतेही नाते नाही. मात्र, तरीही सतत दोघांचे नाते जोडले जात असल्याने आता उर्फीने आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

Ajit Pawar Passed Away: पर्वरीतील कार्यालयाचे उद्घाटन अधुरेच! फेब्रुवारीतील 'दादांचा' नियोजित गोवा दौरा कायमचा रद्द

Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

SCROLL FOR NEXT