Tunisha Sharma Suicide Case: तुनिषाच्या आईवर लेकीचा गळा दाबल्याचा आरोप?

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा एकदा वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
Tunisha Sharma
Tunisha SharmaDainik Gomantak

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. या आत्महत्येने सगळं टेलिव्हिजन विश्वही हादरुन गेलं. सुरुवातीला पोलिसांना या आत्महत्येचं कारण समजु शकलं नव्हतं ;पण नंतर तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरुन शीजान खान याला अटक केली होती.

शीजान खान हा तुनिषाचा सहकलाकार असुन त्याच्यासोबत तुनिषाचे प्रेमसंबंध असल्याचे नंतर उघड झाले. पोलिसांनी शीजानला अटक करताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं.

पुढे या प्रकरणात तुनिषाच्या आईने शीजानवर आणि त्याच्या कुटूंबावर गंभीर आरोप केले होते. शीजानचे कुटुंबिय तुनिषावर मुस्लीम बनवण्यासाठी दबाव टाकत होते, शीजानच्या बहिणी तुनिषाला दर्गाह मध्ये घेऊन जायच्या असाही आरोप केला होता.

यानंतर हे प्रकरण 'लव जिहाद'कडे जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला होता.

तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खान १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. पण या प्रकरणाला पुन्हा एक गूढ वळण मिळालं आहे.

शीजानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या आईवर आता गंभीर आरोप केले आहेत. शिझानच्या कुटुंबियांनी तुनिशाच्या आईवर लेकीचा गळा दाबल्याचा आणि तिला पैसे न देण्याचा आरोप केला.

Tunisha Sharma
Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाने का केला रिक्षाने प्रवास? नेटकऱ्यांनी घेतली मजा...

तुनिशाच्या आईने या आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे, ‘मी शिजानला सोडणार नाही. , मला न्याय हवाय. तुनिशा माझ्यासाठी माझं सर्वस्व होती. शिजान आणि त्याचं पूर्ण कुटुंब या प्रकरणामध्ये सहभागी आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून माझ्या मुलीचं शिझानच्या कुटुंबासोबत नातं अधिक घट्ट झालं होतं. ‘

"शीजानच्या संपूर्ण कुटुंबाने माझ्या मुलीचा वापर केला. मी तुनिशाला पैसै देत नसल्याचा आरोपही त्यांनी माझ्यावर केला. गेल्या तीन महिन्यात मी तुनिशाला ३ लाख रुपये दिले होते. ते तीन लाख तिने कुठं खर्च हे मला माहिती नाही ".

तुम्ही माझं बँक स्टेटमेंट पाहू शकता.’ असं म्हणत तुनिशा शर्माच्या आईने शिजानच्या कुटुंबाने लावलेले गंभीर आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण नेमकं कुठं जाणार हे सांगणं सध्यातरी कठीण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com