रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरुच असून या युद्धाने अवघं जग हादरलं आहे. रशिया युक्रेनला आपल्या तालावर नाचावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे युक्रेन रशियाच्या (Russia) हल्ल्याला जशाच तसे उत्तर देत आहे. या युद्धाने आजच्या काळात सर्वांनाच दोन्ही देशांबद्दल बोलायला भाग पाडले आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटी व्यक्तीपर्यंत सर्वजण या मुद्यावर आपली भूमिका मांडू लागले आहेत. (Ukraine is very special to Leonardo DiCaprio)
दरम्यान, ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो (Leonardo DiCaprio) युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने युक्रेनला (Ukraine) आर्थिक मदत देऊ केली आहे. डिकॅप्रियोने युक्रेनला 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 76 कोटी रुपये आर्थिक मदत म्हणून दिले आहेत. याच पाश्वभूमीवर प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, लिओनार्डो डी कॅप्रियोचे युक्रेनशी काय संबंध आहे.
डिकॅप्रियोचे युक्रेनशी विशेष कनेक्शन
डिकॅप्रियोचा युक्रेनशी खूप जवळचा संबंध आहे. डिकॅप्रियोची आजी युक्रेनची होती. लिओनार्डीची आजी युक्रेनमधील ओडेसामधील होती. म्हणूनच युक्रेन आणि ओडेसा दोन्ही त्याच्यासाठी खूप खास आहेत. आजीला भेटायला तो अनेकदा ओडेसाला गेला आहे. या ठिकाणी त्याने बराच वेळ घालवला आहे. दुर्देवाने त्याच्या आजीचे 2008 मध्ये निधन झाले.
डिकॅप्रियोच्या पालकांचा घटस्फोट झाला
लिओनार्डो डी कॅप्रियोचा जन्म 11 नोव्हेंबर 1974 रोजी झाला. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. डिकॅप्रिओच्या पालकांचा घटस्फोट झाला जेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्याची आई लीगल सेक्रेट्री होती. तर वडील कॉमिक्स कलाकार होते.
लिओनार्डो डी कॅप्रिओची कारकीर्द
लिओनार्डो डिकॅप्रिओने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु त्याला जगभरात खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 'टायटॅनिक' चित्रपटातून. या चित्रपटाने त्याला सुपरस्टार बनवले. या चित्रपटात केट विन्सलेट लिओनार्डो डी कॅप्रियोच्या सोबत दिसली होती. हा चित्रपट आजही चाहत्यांना खूप आवडतो. याशिवाय त्याने 'ब्लड डायमंड', 'द एव्हिएटर', 'द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट', 'द रेवेनंट', 'इनसेप्शन'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.