Raghav Chadha In Mumbai Dainik Gomantak
मनोरंजन

Raghav Chadha In Mumbai : नुकतंच लग्न झालेले राघव चढ्ढा परिणितीला सोडून मुंबईत काय करतायत?

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा झाला ;पण सध्या परिणितीला वेळ देण्याऐवजी ते त्यांच्या पार्टीच्या कामात गुंतले आहेत.

Rahul sadolikar

गेले काही दिवस सोशल मिडीयावर अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. दोघांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला. साखरपुडा पार पडुन काही दिवस होतात न होतात तोच राघव चढ्ढा त्यांच्या पक्षाच्या कामात गुंतले आहेत.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांचा नुकताच साखरपुडा दिल्लीत पार पडला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंगची चर्चा रंगली होती. अखेर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यावरुन व्हायरल होणाऱ्या अफवांवर पडदा पडला आहे. आता राघव चढ्ढा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

त्याचे झाले असे की, आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोट बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्या धर्तीवर वेगवेगळ्या बैठका, शिबीरे यांचे आयोजन करण्यात आले आहे.

नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. येत्या काळात देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा निर्धार यावेळी या नेत्यांनी व्यक्त केला.

यासगळ्यात एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे राघव चढ्ढा. ते आपचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा आणि परिणीतीचा साखरपुडाही झाला आहे.

त्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांचा तो फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. परिणीतीला सोडून राघव चढ्ढा त्या बैठकीत काय करताहेत असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

राघव चढ्ढा आणि परिणीतीच्या साखरपुड्यालाही विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोची जोरदार चर्चा झाली होती.

केजरीवाल यांनी आपल्या खास अंदाजात चढ्ढा आणि परिणीतीला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यानंतर आता राघव चढ्ढा यांचा मातोश्रीवरील तो फोटो व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावर त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ते उद्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला मात्र, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून तो निर्णय बदलला.

हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ते ठाकरे आणि पवारांशी चर्चा करणार आहेत. पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार राघव चढ्ढा देखील त्यांच्यासोबत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT