Controversial Layer's Shot body spray Ad
Controversial Layer's Shot body spray Ad Dainik Gomantak
मनोरंजन

Body Spray Advertisement: बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून सुरु झालेला वाद काय आहे जाणुन घेउया एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

एका परफ्यूम कंपनीच्या जाहिरातीचा सध्या चांगलाच वादात सापडला आहे. अनेक वेळा अशा अनेक जाहिराती केल्या जातात की, त्यावर वाद निर्माण होतो. यंदाहीअसेच काही झाले आहे. लोक या जाहिरातीला वादग्रस्त म्हणत आहेत. ही जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले जात आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे. (Controversial Layer's Shot body spray Advertisement News)

ही जाहिरात लेयर शॉट या नावाच्या ब्रँडची आहे. या जाहिरातीमुळे महिलांना अपमानास्पद वाटत असल्याचे आयबी मंत्रालयाचे म्हणणे आहे. मंत्रालयाचे सहाय्यक संचालक डिजिटल मीडिया क्षितिज अग्रवाल यांनी हे ट्विट केले आहे.

* नेमक काय आहे हा जाहिरातींमध्ये हे समजुन घेउया

बॉडी स्प्रे शॉटच्या पहिल्या जाहिरातीमध्ये (Advertisement) तीन मुले एका रूममध्ये येतात, असे दाखवण्यात आले आहे. रूममध्ये एक मुलगा आधीच एका मुलीसोबत बेडवर बसला आहे. तीन मुले रूममध्ये आल्यावर मुलगी घाबरते. तीन मुलांपैकी एक मुलगा रूममध्ये असलेल्या मुलाला विचारतो की, शॉट मारलास का? मुलीला याचा राग येतो, मग मुलगा उत्तर देतो की, हो मारला आहे. यानंतर आता आमचा नंबर आहे असे तिन्ही मुले सांगतात. आणि बॉडी स्प्रेची बॉटल घेतात.

लेयरच्या शॉट बॉडी स्प्रेच्या (Shot Body Spray) दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये (Video) चार मुले एका दुकानात दिसत आहेत. ते स्टोअरमध्ये परफ्यूम ठेवलेल्या ठिकाणी जातात. तिथे आधीच एक मुलगी आहे. संपूर्ण रॅकवर शॉट डीओची एकच बॉटल आहे. ते पाहून मुलं बोलतात की, आम्ही चार आहोत आणि इथे एकच आहे, मग शॉट कोण घेणार? तेवढ्यात ती मुलगी मागे वळते आणि त्यांच्या बोलण्याने घाबरलेली दिसते. मुलीच्या चेहऱ्यावर राग देखिल दिसतो. तिला वाटते की, ते मुलं तिच्याबद्दल बोलत होते. पण, नंतर त्यांचे लक्ष शॉट डीओकडे जाते.

जाहिरात हटवण्याचे आदेश

या जाहिराती रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला आहे. सर्वांनीच यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटशी संबंधित दोन जाहिरातींवरून वाद झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकारने यूट्यूब (Youtube) आणि ट्विटर (Twitter) या दोन्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT