सर्वोकृष्ट अभिनेता विक्की, अभिनेत्री क्रिती, जाणून घ्या कोणता चित्रपट ठरला सर्वोकृष्ट

IIFA पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
IIFA 2022 Winners
IIFA 2022 WinnersTwitter

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार 2022 जल्लोशात पार पडला. यासोबतच IIFA अवॉर्ड्स 2022 चे विजेते देखील जाहीर करण्यात आले आहेत. अबू धाबीच्या येस आयलंडवर सुरू असलेला IIFA चा 22वा सीझन 2 जूनपासून सुरू झाला आणि 4 जूनपर्यंत चालला. जिथे रोज रात्री बॉलिवूडचे तारे झगमगले. IIFA 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री आणि चित्रपटाचे नावही समोर आले आहे. (IIFA 2022 Winners)

अभिनेता विकी कौशलने आयफा 2022 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब पटकावला आहे. सरदार उधम या चित्रपटासाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 2020 च्या सुरुवातीला आलेल्या, संजू चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये सुद्धा विकी कौशलला आयफा पुरस्कार मिळाला आहे.

त्याचबरोबर अभिनेत्री क्रिती सेनॉनने आयफा 2022 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. क्रिती सेननला हा पुरस्कार तिच्या 'मिमी' चित्रपटासाठी देण्यात आला आहे. क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला मंचावर बोलावण्यात आले होते.

IIFA 2022 Winners
Twinkle Khanna Video: शाहरुखच्या 'जादू तेरी नजर' या गाण्यावर ट्विंकल खन्नाचा अनोखा अंदाज...

सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या आयफा 2022चा टॅग 'शेरशाह'चित्रपटाला मिळाला आहे. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट 'शेरशाह'ठरला आहे.सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे.

तर आयफा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा किताब अभिनेता पंकज त्रिपाठीने पटकावला आहे. यासोबतच सर्व श्रेणीतील विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com