Rajesh Khanna Birth Anniversary:  Dainik Gomantak
मनोरंजन

Rajesh Khanna Birth Anniversary: बालपणीचा गोंडस फोटो शेअर करत ट्विंकल खन्ना झाली भावूक

ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील हा देखील एक विचित्र योगायोग आहे. त्यांच्याच वाढदिवसाला म्हणजेच 29 डिसेंबर रोजी मुलगी ट्विंकल खन्नाचा जन्म झाला. ट्विंकलच्या जन्माने राजेशच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते त्यांच्या पहिल्या मुलीला प्रेमाने टीना म्हणत असत. असं म्हणतात की ट्विंकल लहानपणी खूप आजारी असायची त्यामुळे काका सगळी कामं सोडून स्वतः तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे. हा तो काळ होता जेव्हा त्याच्याकडे चित्रपटांची ओढ असायची. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ट्विंकल सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करून भावूक झाली.

ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर एक थ्रोबॅक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये ट्विंकल खुप गोंडस दिसत आहे. वडील राजेश खन्ना आपल्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहेत. ट्विंकलच्या बालपणीच्या सर्व आठवणी या फोटोसोबत (Photo) जोडल्या आहेत.

या फोटोवर मलायका अरोरा, बॉबी देओल, अनिता श्रॉफ सारखे सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहते ट्विंकल खन्नाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर काही हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सुपरस्टारची आठवण करत आहेत.

अक्षय कुमारने ट्विंकलला मजेदीर व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांसारख्या प्रसिद्ध स्टार्सची मुलगी ट्विंकलनेही अभिनयात हात आजमावला पण आता ती लेखन आणि कुटुंबात व्यग्र आहे. ती इंटिरिअर डिझायनरही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT