Ranbir Kapoor Shraddha Kapoor DainiK Gomantak
मनोरंजन

Tu Jhoothi Main Makkaar : 'तू झुठी मै मक्कार' या दिवशी होणार रिलीज..सणाच्या सुट्टीचा होणार फायदा

लव रंजनचा आगामी तू झुठी मै मक्कार हा या सणाच्या दिवशी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tu Jhoothi Main Makkaar लव रंजन(Luv Ranjan) हा दिग्दर्शक अजब नावाच्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणुन ओळखला जातो. आजवरचे त्याचे सगळे चित्रपट असेच अतरंगी नावाचे आहेत.

लव रंजनच्या 'तू झूठी मैं मक्कार'ने केवळ आपल्या अनोख्या टायटलमुळेच नव्हे तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) धमाकेदार केमिस्ट्रीमुळेही प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढवली आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला.

चित्रपटाचा टिझर पाहून या रोम-कॉम चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच, दर्शक प्रतीक्षा करत असतानाच, निर्मात्यांनी आज एका आकर्षक आणि कव्हर-फुल पोस्टरसह, चित्रपटाचा ट्रेलर 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे.

चित्रपटाचा नवीन पोस्टर रंगीत, मजेदार, आणि आकर्षक आहे. तसेच, हा चित्रपट लव रंजनचा आहे हे लक्षात घेता, चित्रपटाची कथा चांगलीच असेल असा अंदाज प्रेक्षकांकडून लावला जात आहे.

'तू झूठी मैं मक्कार'या सिनेमात एक असे जग पाहायला मिळेल ज्याच्याशी आजचे तरुण नक्कीच रिलेट करतील. आता या चित्रपटाचा ट्रेलर 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, रणबीर आणि श्रद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.साहजिकच होळीच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT