गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन केले जात आहे. दादासाहेब फाळके विभागाअंतर्गत ज्येष्ठ नायिका आणि 60-70 च्या दशकातील 'हिट गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'आशा पारेख' यांचा कटी पतंग चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी खुद्द एव्हरग्रीन आशा पारेख यांनी इफ्फीत हजेरी लावली होती.
(Veteran Actor Asha Parekh at IFFI 53 Goa )
महोत्सवात आशा पारेख यांच्या तीसरी मंझिल (1966), दो बदन (1966) आणि कटी पतंग (1971) हे तीन सिनेमे दाखवले जाणार आहेत. शनिवारी (दि.26) 'कटी पतंग' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला त्यावेळी आशा पारेख उपस्थित होत्या.
यावेळी इफ्फीच्या वतीने आशा पारेख यांचा सत्कार करण्यात आला. आशा पारेख म्हणाल्या, "इफ्फी जगभरातील सिनेरसिकांसाठी पर्वणी असते. यात चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट दाखवणे आणि विक्री करणे सोप्प जाते. माझे माझ्या फिल्म इंडस्ट्रीवर प्रेम आहे. विविध धाटणीचे चित्रपट पाहण्यासाठी जगभरातील सिनेरसिक याठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात."
आशा पारेख यांनी 95 चित्रपटात काम केले आहे. अनेक चित्रपटातील अभिनयासाठी त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. 1971 साली आलेल्या कटी पतंग या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुस्कार मिळाला आहे. तसेच, त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देखील मिळाला आहे.
आशा पारेख यांच्या इफ्फीतील उपस्थितीमुळे सर्वजण जुन्या काळातील आठवणीत रमले होते. आशा पारेख यांनी देखील यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.