Netflix Top 10 Web Series Dainik Gomantak
मनोरंजन

Netflix Top 10 Web Series : नेटफ्लिक्सच्या या टॉप 10 वेबसिरीज पाहिल्या नसतील तर तर या वीकेंडला जरुर पाहा...

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या या वेबसिरीज तुम्हाला मनोरंजनाचा एक वेगळा अनुभव देतील...

Rahul sadolikar

नेटफ्लिक्सचा कंटेट आजवर प्रेक्षकांकडून नेहमीच पसंत केला गेलाय. कॉमेडी, सस्पेन्स थ्रीलर अशा वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्स तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळू शकतात. Netflix वर या आठवड्यात तुमच्यासाठी भरपूर कंटेट उपलब्ध आहे. जर तुम्हाला रोमँटिक वेब सिरीज बघायची असेल तर तुम्ही 'हिडन लव्ह' पाहू शकता. हिंदीत सस्पेन्स-थ्रिलर प्रकार बघायचा असेल तर 'कोहरा' हा एक चांगला पर्याय आहे. Netflix च्या टॉप 10 वेब सिरीजची संपूर्ण यादी वाचा.

रोमान्स, थ्रीलर अन् सर्व काही

तुम्ही दररोज किंवा दर आठवड्याला काही वेब सिरीज पाहत असाल तर हा रिपोर्ट फक्त तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातील टॉप 10 वेब सिरीज घेऊन आलो आहोत. येथे तुम्हाला रोमान्सपासून सस्पेन्स आणि थ्रिलरपर्यंत सर्व काही मिळेल. बरुण सोबतीच्या 'कोहरा'पासून ते कोरियन वेब सीरिज 'हिडन लव्ह'पर्यंत.

1. कोहरा

हा शो १५ जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. याची निर्मिती सुदीप शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन रणदीप झा यांनी केले आहे. या शोमध्ये बरुण सोबती, हरलीन सेठी यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. हा शो सस्पेन्सने भरलेला आहे.

2.विचर (हिंदी)

या वेब शोचा तिसरा सीझन आला आहे. तुम्ही ते हिंदी भाषेतही पाहू शकता. हा एक काल्पनिक ड्रामा आहे. यात हेन्री आणि अन्यासह अनेक कलाकार आहेत.

3. बाकी हनमा

तुम्हाला अॅनिमेशनमध्ये काही पाहायचे असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. जपानी भाषेव्यतिरिक्त,तुम्हाला ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये देखील पाहता येईल.

4. किंग द लँड

ही कोरियन वेब सिरीज तुम्ही हिंदीमध्ये पाहू शकता. या शोमध्ये ली जून-हू, लिम यून-आह यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. या शोमध्ये कॉमेडी आणि रोमान्ससोबत इमोशनल सीन्सही आहेत.

5. जुजुत्सु कैसेन

या अॅनिमेशन वेब सिरीजचा दुसरा सीझन आला आहे. ही एक गडद कल्पनारम्य आहे कथा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची जीवनकथा सांगितली आहे.तुम्ही या सिरीजचा पहिला भाग पाहिला असेल तर दुसराही जरुर पाहा.5

6.माय हॅप्पी मॅरेज

ही देखील एक अॅनिमेशन वेब सिरीज आहे. तुम्ही ती फक्त जपानी आणि इंग्रजी भाषेत पाहू शकता. यात एका महिलेची कहाणी दाखवण्यात आली आहे जिला तिच्या आयुष्यात खूप गोष्टींचा सामना करावा लागतो.

7.कॅट

पंजाबी व्यतिरिक्त तुम्ही हा शो हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही पाहू शकता. ही एक गुन्हेगारी मालिका आहे. या मालिकेत तुम्हाला क्राईम थ्रीलर जॉनर अनुभवायला मिळेल.

8. फेटल सिडक्शन

एका विवाहित प्राध्यापकाचे एका विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होते. यानंतर खरा खेळ सुरू होतो. या वेब शोचे नवीन भागही आले आहेत. तुम्ही या शोच्या गोष्टीत रमून जाल. तुम्हाला अशा प्रकारचा जॉनर आवडत असेल तर ही कलाकृती तुमच्यासाठीच आहे.

9.हिडन लव्ह

ही वेब सिरीज तुम्ही इंग्रजी सबटायटल्ससह पाहू शकता. यामध्ये तुम्हाला कॉमेडीसोबतच रोमान्सही पाहायला मिळणार आहे. लव्हस्टोरी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही एक भन्नाट वेबसिरीज आहे.

10 द लिंकन लॉयर

या वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनचे पाच एपिसोड्स आले आहेत. त्याला खूप पसंत केले जात आहे, ज्याच्या कथेत खूप ट्विस्ट आहेत. ही सिरीज नक्कीच तुम्हाला आवडे.या दहा वेबसिरीज तुमच्या वीकेंडला स्पेशल बनवण्यासाठी नक्कीच पुरेशा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT