ShahRukh Khan's Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

भाईजानने केलं किंग खानला स्पेशल 'बर्थ डे विश'..

शत्रुत्व विसरून दोन्ही तारे झाले मित्र...

दैनिक गोमन्तक

आज बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (ShahRukh Khan ) वाढदिवस (BirthDay) आहे. या खास प्रसंगी त्यांना जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. शाहरुख खानचे चाहते जगभर असल्याने त्यामुळे आज जगाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाचे वातावरण आहे. सेलिब्रेशनच्या या वातावरणात सलमान खानच्या एका ट्विटने फुटेज खाल्लं आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (ShahRukh Khan's Birthday). सलमान खानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे. माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आर्यन खान ड्रग प्रकरणात भाईजानने शाहरुखला केली मदत

आर्यन खान ड्रग प्रकरणी शाहरुख खानला शक्य ती सर्व प्रकारे मदत करून कलाकार सलमान खानने मैत्रीचे कर्तव्य बजावले. आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुखला सलमानची सर्वाधिक गरज होती आणि तो त्यावेळी किंग खानच्या पाठीशी उभा होता. सलमान खानने ज्या प्रकारे शाहरुख खानला वाईट काळात साथ दिली त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. याच कारणामुळे शाहरुख खान सलमानला आपला चांगला मित्र म्हणत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

शत्रुत्व विसरून दोन्ही तारे झाले मित्र:

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात काही काळापर्यंत वैर सुरू होते. एका पार्टीत भांडण झाल्यानंतर हे दोन्ही स्टार वेगळे झाले होते. मात्र, एकमेकांची चूक विसरून आता त्यांनी मैत्रीचे हात जोडले आहेत. सलमान खान आणि शाहरुख खानची मैत्री चाहत्यांसाठी रुपेरी ठरली आहे. जेव्हापासून हे दोन स्टार्स मित्र बनले आहेत, तेव्हापासून ते चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत दिसले आहेत आणि टीव्हीवरील अनेक शोमध्येही एकत्र दिसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT