Bollywood actress Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranaut: 'टीकू वेड्स शेरू'मुळे कंगनाला आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाली...

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut: कंगणा रनौत सध्या तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरु' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने 23 जूनला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमॅझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याची अनाऊंसमेंट केली होती. आता कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे ती पून्हा चर्चेत आली आहे.

कंगनाने टिकू वेड्स शेरुच्या प्रमोशनदरम्यान आपल्या करिअरमधील संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती म्हणते- 'आज आमच्याजवळ स्टारडम आहे, आमचे चाहते आहेत आणि संपूर्ण जग आमच्यावर खूप प्रेम करते.' परंतु आम्ही या बॉलीवूडचे दूसरे रुपदेखील पाहिले आहे.

सुरुवातीच्या काळात जेव्हा ऑडीशनमध्ये करण्यासाठी काहीतरी वेगळे ठरवलेले असायचे आणि तिथे जाऊन वेगळे काहीतरी करुन परतायचो थोडक्यात भरकटायचो. पण या सगळ्यातदेखील बॉलीवूडचे स्वप्न मात्र तसेच कायम राहिले. बॉलीवूडने अनेक लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. हा सगळा संघर्ष नवाजुद्दीन सिद्दीकीसहित आम्ही सगळ्यांनी केला आहे, असेही कंगनाने म्हटले आहे.

कंगना पुढे म्हणते, मी संघर्षावर मात करुन इंजस्ट्रीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मी खूप व्यस्त अभिनेत्री आहे. मी जे काही करते ते फक्त स्वताला व्यस्त ठेवण्यासाठी करत नाही त्यापाठीमागे खूप मोठा अर्थ असतो.

टीकू वेड्स शेरु या प्रोजेक्टचे माझ्यासाठी महत्वाचा कारण मला अभिनेते आणि अभिनेत्रींच्या पाठीमागे जे लोक काम करतात त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे समरुप व्हायचे होते. त्यांचे आयुष्य जवळून पाहिल्यानंतर त्या संघर्षाची जाणीव होते. संघर्षाची ही गोष्ट लोकांच्या पसंतील नक्कीच उतरेल आणि म्हणून मी या प्रोजेक्टमध्ये सामील झाले, असे कंगनाने म्हटले आहे.

'टीकू वेड्स शेरु' ही अशी कॉमेडी-ड्रामा फिल्म आहे, जी वास्तविक जीवनातील संघर्ष समोर आणते. टीकू आणि शेरु हे एकमेकांपेक्षा अगदी विरुद्ध असूनदेखील त्यांचे स्वप्न एकच आहे. अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. आता कंगनाने प्रोड्यूस केलेला तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांवर भूरळ घालण्यात यश मिळवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT