Tigmanshu Dhulia On Shahrukh Dainik Gomantak
मनोरंजन

Tigmanshu Dhulia On Shahrukh : अगदी थोडं जेवण आणि बसमध्ये झोप... सुपरस्टार असतानाही शाहरुखने या चित्रपटासाठी साधेपणा दाखवला..

शाहरुख खानला त्याच्या लोकांशी नम्र वागण्यामुळे ओळखले जाते, असाच एक किस्सा दिग्दर्शक तिग्मांशु धुलियाने सांगितला आहे.

Rahul sadolikar

शाहरुख खान गेली 3 दशके बॉलिवूडवर आपला प्रभाव टिकवून आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड कलाकारांमध्ये त्यांची गणना होते. किंग खानला चित्रपटसृष्टीत २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 

इतक्या वर्षांनंतरही त्याच्या स्टारडममध्ये कसलीही घसरण झाली नव्हती. किंग खान त्याच्या सहकलाकारांसोबतच्या डाउन टू अर्थ वर्तनासाठी प्रसिद्ध आहे. शाहरुखच्या नम्रपणाचा आणि मेहनतीचा किस्सा आता दिग्दर्शक तिग्मांशु धुलियाने सांगितला आहे.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'पासून 'पठाण'पर्यंत शाहरुख खानने अनेक चित्रपटांतून लोकांचे मनोरंजन केले आहे. 1998 मध्ये त्याचा 'दिल से' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुखने मनीषा कोईरालासोबत रोमान्स केला होता.

ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांसाठी हा चित्रपट लक्षात राहतो. पण या चित्रपटाच्या कथेनेही प्रेक्षकांना बांधून ठेवले, जे तिग्मांशु धुलियाने लिहिले होते. तिग्मांशू धुलियाने चित्रपटाच्या रिलीजच्या 24 वर्षांनंतर शाहरुखशी संबंधित एक गोष्ट उघड केली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिग्मांशु धुलियाने शाहरुख खानसोबत 'दिल से'मध्ये काम करतानाचा काळ आठवला . एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, शाहरुख आजही सुपरस्टार आहे, तो तेव्हाही सुपरस्टार होता. 

त्याने सांगितले की, मणिरत्नम वेगवेगळ्या लोकेशन्सवर शूट करायचे. चित्रपटाचे चित्रीकरण दूरवरच्या ठिकाणी व्हायचे.

तिग्मांशु धुलियाने सांगितले की, शाहरुख खूप कमी अन्न खातो. 'दिल से'च्या शूटिंगदरम्यान तो पटकन जेवण उरकायचा. जेवणाची वेळ एक तासाची होती. जेवण आटोपल्यानंतर शाहरुख थोडा वेळ बसच्या जमिनीवर झोपायचा. किंग खानची स्तुती करताना तिग्मांशु धुलियानेही तो एक चांगला माणूस असल्याचे सांगितले.

तिग्मांशू धुलियाने शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटातही काम केले आहे. मात्र, त्याने चित्रपटात अभिनय केला आहे. या चित्रपटात तिग्मांशू धुलियाने शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT