Salman Khan, Shahrukh khan Hritik Roshan in Tiger 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3 Box Office Collection: भाईजानच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ! केला १०० कोटींचा आकडा पार

Tiger 3 Box Office Collection: यामध्ये चित्रपटाने केवळ हिंदी भाषेतून 99.43 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Tiger 3 Box Office Collection: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मनीष शर्माच्या टायगर ३ चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठा विक्रम केला, तर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने देशात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. 'टायगर 3' दिवाळीच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला रिलीज झाला. त्या दिवशी 44.5 कोटींची कमाई झाली होती, मात्र दुसऱ्या दिवशी कमाई आणखी वाढल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'टायगर 3' ने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी अपेक्षेपेक्षा दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आणि सर्व भाषांमधून 57.52 कोटी रुपये जमा केले. मात्र, चित्रपटाने तेलगू भाषेतून केवळ 87 लाख रुपये आणि तामिळ भाषेतून 22 लाख रुपये कमावले. अशाप्रकारे दोन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 102.02 कोटी झाले आहे. यामध्ये चित्रपटाने केवळ हिंदी भाषेतून 99.43 कोटींची कमाई केली आहे.

'टायगर 3' मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशनच्या कॅमिओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले ​​आहे. खलनायक बनलेल्या इमरान हाश्मीनेही आपल्या जबरदस्त अॅक्टिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येत असून दिवाळीसारख्या सण असूनदेखील लोक चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. रात्रीच्या शोमध्येही चांगला व्याप दिसून आला. पहिल्या दिवशी हीच परिस्थिती होती. दुसऱ्या दिवशी आणखीनच जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. आता सलमानचा हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

SCROLL FOR NEXT