Tiger 3 Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3 Box Office Collection: पहिल्याच दिवशी भाईजानच्या चित्रपटाने केला नवा रेकॉर्ड; गदर 2 ला देखील टाकले मागे

दैनिक गोमन्तक

Tiger 3 Box Office Collection: बॉलीवूडच्या भाईजानने म्हणजेच सलमान खानने दिवाळीत टायगर ३ चित्रपट रिलिज करुन चाहत्यांना खूष केले आहे.

१२ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड सेट केले आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, टायगर 3 ने पहिल्या दिवशी 44.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

टायगर हा 3 वर्षातील चौथा मोठा चित्रपट ठरला आहे, ज्याने पहिल्याच दिवशी 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. टायगर 3 ने सनी देओलच्या गदर 2 चा देखील मागे टाकले आहे.

रिपोर्ट्सनुसार, गदर 2 ने पहिल्या दिवशी 40.10 कोटींची कमाई केली होती. तर सलमानच्या टायगर 3 ने पहिल्या दिवशी 44.50 कोटींची कमाई केली आहे.

मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि बेंगळुरूमध्ये टायगर 3 साठी चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक गर्दी दिसून आली आहे.

चित्रपटातील सलमान खानच्या नेत्रदीपक प्रवेशापासून ते कतरिना कैफच्या जबरदस्त अ‍ॅक्शनपर्यंत असे संपूर्ण मनोरंजन टायगर 3 मध्ये पाहायला मिळेल.

तसेच, इमरान हाश्मीने त्याच्या ग्रे-शेडेड अवताराने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

टायगर 3 मध्ये सलमान खानच्या अ‍ॅक्शनसोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे कॅमिओ देखील पाहायला मिळत आहेत. टायगर 3 चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्राने केले आहे.

आता भाईजानचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालणार का, बॉलीवूडमध्ये नवे रेकॉर्ड सेट करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT