Katrina Kaif and Salman Khan's Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3: चित्रपटगृहात येण्याआधीच सलमानच्या टायगरचा बॉक्स ऑफीसवर धमाका

Tiger 3: रविवारी रात्रीपर्यंत देशभरात 'टायगर 3' च्या 1.42 लाख तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Tiger 3: सलमान खानचा टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र चित्रपटगृहात येण्याआधीच या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर 'टायगर 3' ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून पहिल्याच दिवशी जवळपास 1.50 लाख तिकिटे विकली गेली आहेत. अजून सहा दिवस बाकी आहेत.

टायगर आणि झोयाची कथा पाहण्यासाठी चाहत्यांचा हा उत्साह आश्चर्यचकित करणारा आहे कारण 12 नोव्हेंबरला दिवाळी आहे, त्यामुळे सण असूनही पहिल्याच दिवशी चाहते चित्रपट पाहण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. ज्या वेगाने अॅडव्हान्स बुकिंग होत आहे, त्यावरून सलमान खानचा 'टायगर 3' रिलीज होण्याआधीच एक नवा रेकॉर्ड तयार करण्याची शक्यता आहे.

मनीष मल्होत्रा ​​यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा 5 वा चित्रपट आहे. या विश्वाचा पहिला अॅक्शन हिरो अविनाश राठौर उर्फ ​​टायगर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

'टायगर 3'ची अॅडव्हान्स बुकिंग 5 नोव्हेंबरपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. तर काही निवडक चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्स साखळींमध्ये शनिवारी रात्रीपासूनच तिकिटांची विक्री सुरू झाली होती. समोर आलेल्या रिपोर्टनुसार रविवारी रात्रीपर्यंत देशभरात 'टायगर 3' च्या 1.42 लाख तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.

तर सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत हा आकडा 1.50 लाखांच्या पुढे गेला आहे. रविवारी आगाऊ बुकिंगमधून सुमारे 4.50 कोटी रुपयांची कमाई आगाऊ बुकिंग विंडो उघडताच, 'टायगर 3' ने 1.50 लाख तिकिटांच्या विक्रीतून 4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी एकूण १.३९ लाख तिकीटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. देशात हिंदी 2D आवृत्तीचे एकूण 7231 शो आहेत. तर IMAX 2D आवृत्तीसाठी 2713 तिकिटांची आगाऊ बुकिंगही करण्यात आली आहे. 'टायगर 3'चे 109 शो देशातील एकूण 23 आयमॅक्स स्क्रीनवर दाखवले जाणार आहेत.

दरम्यान, १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आता सलमान आपली जादू कायम ठेवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT