Priyanka Chopra: 'जोपर्यंत वडील जिवंत होते, तोपर्यंत...' देसी गर्लला आली वडीलांची आठव

Priyanka Chopra: मला वाटतं तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता, जिथे मला जाणवलं की आयुष्य खूप लहान आहे
Priyanka Chopra
Priyanka Chopra Dainik Gomantak
Published on
Updated on

Priyanka Chopra: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठ्या चर्चेत असतात. आता बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे.

जेव्हा ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती आणि कामासोबतच कुटुंब सांभाळत होती. एका मुलाखतीदरम्यान म्हणाली की, तरुणांवर प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याचा दबाव असतो.

ती म्हणाली की ती कधीकधी तिच्या आईला कॉल करणे किंवा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास विसरायची मात्र पण वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर परिस्थिती बदलली.

प्रियांका पुढे म्हणते की, तिचे वडील आजारी पडल्यानंतर तिला वेळेचे महत्त्व कळले. प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांचे २०१३ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. ती म्हणाली, 'मला आठवत नाही की मी माझ्या आईचे किती वाढदिवस विसरले किंवा तिला शुभेच्छा दिल्या नाहीत.

माझ्या वीशीमध्ये मी किती वेळा तिला कॉल करायला विसरलो आणि किती वेळा मी दिवाळी मिस केली कारण मी युरोपमध्ये काम करत आहे आणि इथे दिवाळी साजरी होत नाही, त्यामुळे तेही ठीक आहे.

'माझ्या वडिलांचे निधन होईपर्यंत माझ्याकडे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी वेळ नव्हता. जेव्हा तो आजारी पडले, तेव्हा माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती.

मला वाटतं तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता, जिथे मला जाणवलं की आयुष्य खूप लहान आहे आणि आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करत असतो. काळजी करण्यासारख्या अनेक मोठ्या गोष्टी आहेत.

Priyanka Chopra
Leo Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर लिओचीच जादू...कलेक्शन रिपोर्ट एकदा वाचाच

प्रियांका चोप्राचे तिच्या वडिलांशी घट्ट नाते होते. तिने तिच्या वडिलांना समर्पित डॅडीज लिटल गर्ल असा एक टॅटू देखील काढला आहे, प्रियांका चोप्रा नुकतीच कामानिमित्त भारतात आली होती.

ती MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती आणि नंतर मुंबईत JIO वर्ल्ड प्लाझाच्या लाँचिंगला तिने हजेरी लावली.

प्रियांका( Priyanka Chopra )च्या आईला नुकतेच अॅनाफिलेक्सिसच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रियांका चोप्रा आता अमेरिकेत परतली आहे. ती पुढे जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत हेड्स ऑफ स्टेट्समध्ये दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com