Kota Factory, Midnight Massसह या वेब सिरीज होणार आज रिलीज Dainik Gomantak
मनोरंजन

Kota Factory, Midnight Massसह या वेब सिरीज होणार आज रिलीज

दैनिक गोमन्तक

अनेक चित्रपट (Movies) आणि वेब सिरिज (Web series) शुक्रवारी रिलीज होत असतात. त्यामुळे या वीकेंडला (Weekend) तुम्ही घरी बसून चित्रपटांचा आणि वेब सिरिजचा आनंद घेवू शकता. विशेष बाब म्हणजे आज प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सिरिज हे सर्व वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. काही कॅामेडी (Comedy) , तर काही हॉरर (Horror) आणि सामाजिक विषयांवर आधारित आहे. चला तर जाणून घेवूया आज प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब शो बद्दल अधिक माहिती.

* कोटा फॅक्टरी (Kota Factory)

कोटा फॅक्टरी ही भरतातील पहिली ब्लॅक अँड व्हाइट वेब सिरिज आहे. ही वेब सिरीज कोटाच्या विद्यार्थी, लोक आणि कोचिंग उद्योगावर आधारित आहे. या वेब सिरिजमध्ये एक वैभव नावाचा विद्यार्थी आणि शिक्षक जितू भैया यांच्या माध्यमांतून तिथली गोष्ट सांगणार आहेत. या वेब शो मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची गोष्ट सांगितली आहे. कोटा फॅक्टरीचा पहिला सीजन 2019 मध्ये रिलीज झाला होता. हा शो तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

* द स्टार्लिंग (The Starling)

मेलीसा मॅकार्थी आणि क्रिस ओ डाऊड स्टारर द स्टारलिंग या चित्रपटात उपचार आणि दु:खाचे महत्व स्पष्ट केले आहे. खर तर, जेव्हा लीली आणि जॅक बाळ जन्माला येण्यापूर्वीच हरवून बसतात, तेव्हा एक पक्षी त्यांच्या घरी घरटे बांधतो. यानंतर लीलीच्या आयुष्यात काय बदल होतात, हे तुम्हाला या चित्रपटात दिसेल. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

* गोलिएथ सीजन 4 (Goliath)

अॅमेझाॅन प्राइम व्हिडिओचा हा लोकप्रिय शो गोलिएथचा चौथा सीझन रिलीज होत आहे. या शोमध्ये तुम्हाला बदला घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिली मॅकब्राइडची गोष्ट पाहायला मिळणार आहे. बिली आपला बदला पूर्ण करण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जाईल हे तुम्हाला या सीझनमध्ये पाहायला मिळेल.

* मिडनाइट मास (Midnight Mass)

द हंटिंग हिल हाऊसच्या निर्मात्यांनी तयार केलेले, मिडनाइट मास क्रोकेट बेटाच्या वेगळ्या समुदायाची हॉरर गोष्ट दर्शवली आहे. जेव्हा नवीन फादर चर्चमध्ये येतात, तेव्हा काही अलौकिक गोष्टी त्या शहरातील लोकांसोबत घडू लागतात. जर तुम्हाला हॉरर चित्रपट आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT