दरवर्षी 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर (doctor) दिन म्हणून साजरा केला जातो.  Dainik Gomantak
मनोरंजन

Doctor's Day: डॉक्टरच्या भूमिकेत दिसलेत बॉलिवूडचे 'हे' प्रसिद्ध कलाकार

डॉक्टरांना (doctor) देवाचे एक रूप मानले जाते. ते केवळ जगात नवीन जीवन आणत नाहीत, तर जीव वाचवून लोकांना नवीन जीवन देतात.

दैनिक गोमन्तक

डॉक्टरांना (doctor) देवाचे एक रूप मानले जाते. ते केवळ जगात नवीन जीवन आणत नाहीत, तर जीव वाचवून लोकांना नवीन जीवन देतात. कोरोना विषाणूच्या (covid 19) साथीच्या वेळी, त्यांनी स्वत: ची चिंता न करता ज्या प्रकारे आपले कर्तव्य बजावले त्याचे कौतुक करणे कमी आहे. बॉलिवूडमध्येही (Bollywood) डॉक्टरांचे महत्त्व, त्यांचे त्याग आणि गोष्टी रुपेरी पडद्याद्वारे उत्तम प्रकारे मांडल्या गेल्या आहेत. शाहिद कपूरपासून संजय दत्तपर्यंत कलाकारांनी (celebrities) पडद्यावर डॉक्टरांची भूमिका साकारली आहे. दरवर्षी 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctor's Day) म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ बिधानचंद्र रॉय (Bidhan Chandra Roy) यांची आज जयंती आणि पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.(These Bollywood stars who played the role of doctor on screen)

बोमन इराणी - मुन्नाभाई एमबीबीएस

2003 साली रिलीज झालेला 'मुन्ना भाई एमबीबीएस' हा भारतातील डॉक्टरांच्या कार्याभोवती बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. संजय दत्तने यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर बोमन इराणी आणि ग्रेसी सिंग यांच्यासारख्या कलाकारांना डॉक्टर म्हणून पाहिले गेले होते.

अमिताभ बच्चन - आनंद

अमिताभ बच्चन यांनी सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे आनंद चित्रपटात डॉ भास्कर के. बॅनर्जीची भूमिका साकारली होती.

शाहिद कपूर - कबीर सिंग

वर्ष 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'कबीर सिंह' चित्रपटात शाहीद कपूरने सर्जनची भूमिका साकारली होती.या सिनेमात कियारा अडवाणीही होती. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.

करीना कापुर - उडता पंजाब

अभिषेक चौबे याने उडता पंजाब हा चित्रपट दिग्दर्शित केला. अभिनेत्री करीना कपूर खानने उडता पंजाबमध्ये डॉक्टरची भूमिका साकारली होती तसेच करीनाने की अँड का आणि 3 इडियट्समध्ये देखील डॉक्टरची भूमिका निभावली होती.

डिअर जिंदगी - शाहरुख खान

डिअर जिंदगी हा चित्रपट गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये शाहरुख खान ने यामध्ये जहांगीर जुग खान म्हणून डॉक्टरची भूमिका साकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी, न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

SCROLL FOR NEXT