यंदाचा इफ्फी गोव्याचा भासलाच नाही... Dainik Gomantak
मनोरंजन

यंदाचा इफ्फी गोव्याचा भासलाच नाही...

आजचा इफ्फी (IFFI) पाहीला तर "वो भी क्या दिन (इफ्फी) थे!’ अशी म्हणायची पाळी येते.

दैनिक गोमन्तक

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) सरकारच्या काळातला इफ्फी (IFFI) म्हणजे पणजीतली (Panaji) जणू काही भव्य मोठी जत्राच आहे असे वाटायचे. मांडवीच्या किनाऱ्यावरच्या रस्त्याच्या कडेला गोमंतकाची झलक देणारे विविध स्टाॅल्स, रोषणाई, नावाजते कलाकार, इफ्फीच्या (IFFI) प्रतिनिधीनी भरलेले भरघच्च रस्ते, इफ्फीत (IFFI) प्रतिनिधी न बनु शकलेल्या नागरीकांची रस्त्यावरील इफ्फीची (IFFI) दालने पाहण्यासाठी उसळलेली तोबा गर्दी अन बरेच काही! सुरुवातीचे ती इफ्फी (IFFI) म्हणजे पर्वणी होती. मात्र आजचा इफ्फी पाहीला तर "वो भी क्या दिन (इफ्फी) थे!’ अशी म्हणायची पाळी येते. कोरोना महामारीमुळे (Corona) की इफ्फीच्या (IFFI) आयोजकांत आलेल्या मरगळीमुळे इफ्फी (IFFI) फिकट होत चाललाय याचे आत्मपरिक्षण इफ्फी (IFFI) आयोजकांनी करणे महत्वाचे आहे. थिएटरमध्ये सिनेमा (Movie) चालुच आहेत पण त्यांचेही शेड्युलींग दोषपुर्ण! लोकांचे अर्थपुर्ण सिनेमांवर (Movie) असलेले प्रेम आयोजनाच्या अनेक त्रुटींवर पांघरूण घालते पण इफ्फीच्या (IFFI) आंतरराष्ट्रीय दर्जाला ते शोभणारे नाही.

52 वा इफ्फी (IFFI) महोत्सव काल पार पडला. यंदाचा महोत्सवही तसा कोरोना महामारीच्या (Corona) सावटीखालीच झाला. आधुनिक तंत्रांच्या मदतीने यावर्षी महोत्सवाचे आयोजन हायब्रीड पध्दतीने करण्यात आले होते त्यामुळे बरेचसे मास्टरक्लास, इन कंव्हर्सेश विथ व अन्य काही कार्यक्रम आॅनलाईन (online) माध्यमातून घेण्यात आले तर काही सिनेमांच्या पत्रकार परिषदा, मास्टरक्लास व चर्चासत्रांचे आयोजन प्रत्यक्ष रूपात झाले.यंदा इफ्फीत (IFFI) विदेशी प्रतिनिधींची संख्या खुपच कमी होती. केरळ, हैदराबाद व दक्षिण गोव्यातील (Goa) इफ्फी प्रतिनिधींचा आकडा बराच असल्याचे जाणवले.

यावेळी सिनेमांच्या कॅटलाॅगपासून ,सिनेमांचे तिकीट बुकींग आॅनलाईन करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांची काउंटरपुढे होणारी समस्या यावेळेस आढळून आली नाही मात्र इंटरनेट (Internet) समस्या असणार्‍या प्रतिनीधीं मात्र सिनेमांचे बुकींग (Booking) व अन्य गोष्टीबाबत हिरमुलेले राहिले. थिएटरबाहेरची रश लाईन कोणीतरी आपल्या सुपीक डोक्याने रद्द केल्यामुळे थिएटरमधल्या खुर्च्या रिकाम्या असूनही, तिकीट नसल्यामुळे अनेकाना चांगल्या सिनेमांना पाहण्यास मुकावे लागले. इफ्फीत प्रतिनिधी होण्यासाठी नाव नोंदणी करूनही बऱ्याचशा जणांची नोंदणी न झाल्याचेही आढळले. नेमलेल्या मल्याळी बाऊंसरकडून लोकांना धमकविण्याची भाषा व उडवा-उडवीची उत्तरे देण्याचे चित्र पहिल्यांदा इफ्फीत(IFFI) पाहायला मिळाले.

यंदाचा इफ्फी (IFFI) तसा हायटॅक झाला आहे याचे कौतुकच करावे लागेल. पण आधुनेकतेशी सांगड घालताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील या महोत्सवास ‘गोमंन्तका’ची जी झालर होती तिला अगदी पूर्णविरामच दिल्याचे आढळून आले. ना गोमंतकीय खाण्याच्या जिन्नसाचे दालन, ना गोमंतकीय कलाकारांचे कार्यक्रम. इफ्फीच्या(IFFI) परिसरात रेड कार्पेटवर चालताना वाजवण्यात येणारी गाणी सोडली तर काहीच गोमंतकीय असल्याचे दिसले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT