Movie based on Lalu Prasad Yadav Dainik Gomantak
मनोरंजन

Lalu Prasad Movie: लालू प्रसाद यादव यांच्यावर बनतोय चित्रपट, प्रकाश झा दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा

Rahul sadolikar

Movie based on Lalu Prasad Yadav: आपल्या विनोदी शैलीने सभागृहाला खळखळून हसवणारे प्रसिद्ध भारतीय राजकारणी लालू प्रसाद यादव यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही. लालूजींनी आजवर केलेली भाषणं युट्यूबर रील्स आणि व्हिडीओच्या स्वरुपात यूजर्सकडून पसंत केली जातात.

काही दिवसांपूर्वी यूपीए सरकारच्या काळात संसदेत रेल्वेमंत्रीपदावरुन लालू जी आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेला वाद विवाद आणि लालूजींनी दिलेले विनोदी उत्तराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लालू प्रसाद यादव यांच्यावर एका चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

विनोदबुद्धी आणि लालू प्रसाद यादव

कुशल राजकारणी असल्याने लालूजींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक लोकांना पराभूत केले आहे. 

त्यांची विनोदबुद्धी असो किंवा राजकारणातील त्यांची चाल असो, त्यांची शैली वेगळी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर तो प्रत्येक गोष्टीत पारंगत आहे. आता लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर चित्रपट बनणार असल्याची बातमी समोर येत आहे. 

अधिकृत माहिती

रिपोर्ट्सनुसार, खुद्द राष्ट्रीय जनता पार्टीने ही माहिती दिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटावर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट बनवण्याचे अधिकार यादव कुटुंबाकडून घेण्यात आले आहेत. हा चित्रपट प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रकाश झा यांचं दिग्दर्शन

तेजस्वी प्रसाद या चित्रपटात पैसे गुंतवत असल्याचीही बातमी चित्रपटाबाबत समोर येत आहे. तेजस्वीने लालू प्रसाद यादव यांच्या बायोपिकसाठी पैसेही दिले आहेत. याबाबत प्रकाश झा यांना विचारले असता ते जोरजोरात हसायला लागले. 

राजदचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांना या चित्रपटाबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'जर चित्रपट बनत असेल तर चांगली गोष्ट आहे. आपल्या देशातील जनतेला लालू प्रसाद यादव यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यात रस आहे. यापूर्वीही त्यांच्यावर अनेक पुस्तके आणि चित्रपट बनले आहेत.

Alka Kubal: ''गोव्याच्या मातीतून अनेक मोठमोठे कलाकार जन्माला आले, परमेश्वराने...''; अलका कुबल यांनी काढले गौरोद्गार!

करणने गर्लफ्रेन्ड तेजस्वीसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस; लव्हबर्ड्सने शेअर केले Photo, Video

Goa Monsoon: गोव्यात बळीराजा चिंताग्रस्त! परतीच्या पावसाने हाहाकार; भातशेतीची पुन्हा नासाडी

Goa Fishing: मान्‍सूनोत्तर पाऊस! यांत्रिकी बोटींना वरदान पण...

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

SCROLL FOR NEXT