Jawan Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Controversy : 'शाहरुख'च्या जवानविरुद्ध बांग्लादेशात निदर्शने... वादाचं नेमकं कारण काय?

Rahul sadolikar

सध्या मनोरंजन विश्वात शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. 7 सप्टेंबरला चित्रपट जगभरात रिलीज होण्यासाठी सज्ज असताना आता चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

जवान चित्रपटाबाबतचा हा वाद भारतात नव्हे तर बांग्लादेशात निर्माण झाला आहे. चित्रपटाबाबतची नाराजी इतकी वाढली आहे की, आता या चित्रपटाविरोधात निदर्शन करण्यात आली आहेत.

'पठान'चाही असाच वाद

2023 च्या सुरूवातीला रिलीज झालेला आणि कमाईचे अनेक उच्चांक गाठलेला शाहरुख खानचा पठान सुरूवातीला वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 'जवान'च्या बाबतीत असाच एक वाद निर्माण झाला आहे.

पठानने जवळपास जगभरात 1 हजार कोटींची कमाई केली होती. शाहरुख खान 'जवान'ही रिलीजच्या आधी चांगली कमाई करत आहे. गेल्या शुक्रवारी देशभरात चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग सुरू झाले आणि चाहत्यांनी त्यांच्या सीट्स राखीव केल्या आहेत.

जवान बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल असे चित्र दिसत असताना बांगलादेशात या चित्रपटाबाबत निदर्शने होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

बांग्लादेशी चित्रपटसृष्टीला धोका

जवानला समीक्षक आणि स्थानिक चित्रपटसृष्टीचा विरोध होत आहे. जवानला विरोध करणाऱ्यांचं मत आहे की, खराब कामगिरी करणाऱ्या बांग्लादेशी चित्रपटांची जागा SAFTA करारांतर्गत मोठं बजेट असणारे बॉलीवूड चित्रपट का घेत आहेत,? 

ते म्हणतात की "आपण आपल्या चित्रपटगृहात परदेशी चित्रपट प्रदर्शित करत आहोत आणि आपल्या देशातील चित्रपटांना का पुढे ढकलत आहोत. अशाप्रकारे बांगलादेश चित्रपटसृष्टी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल".

बांग्लादेशी चित्रपटसृष्टीवर संकट?

जवानच्या निमित्ताने समोर आलेल्या या वादामुळे बांग्लादेशी इंडस्ट्रीत गृहयुद्ध सुरू झाले आहे. अलिकडच्या वर्षांत बांगलादेशी चित्रपटसृष्टीत प्रचंड वाढ झाली आहे.

 'हवा', 'पोरों', 'प्रियोतोमा' आणि 'शुरोंगो' सारखे प्रशंसनीय चित्रपट बनवले गेले आहेत, ज्यांनी केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच यश मिळवले नाही तर जागतिक बॉक्स ऑफिसवरही छाप पाडली आहे. 

'जवान' सोबत दोन बांगलादेशी चित्रपट नियोजित होते ;पण जवान चित्रपटासाठी बांग्लादेशी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

जवान बांग्लादेशात रिलीज होणार का?

जवानसाठी बांग्लादेशी चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याच्या या निर्णयामुळे परदेशी चित्रपटांचा बांग्लादेशी फिल्म इंडस्ट्रीवर काय परिणाम झाला आहे याची चर्चा रंगली आहे. 

 जवानला होणारा विरोध पाहता हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT