Prabhas Kriti Senon Dainik Gomantak
मनोरंजन

Prabhas - Kriti Affair : प्रभास आणि क्रितीच्या प्रेमाच्या चर्चा का होतायत? लग्नाचा प्रश्न येताच प्रभास खुलला..

आदिपुरुष चित्रपटात एकत्र आलेले प्रभास आणि क्रिती यांच्या अफेअर नंतर आता लग्नाच्या चर्चा होतायत.

Rahul sadolikar

गेले काही दिवस आदिपुरुष चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहेत. या चित्रपटासोबतच आता प्रभास आणि क्रिती यांच्या लग्नाची चर्चाही सोशल मिडीयावर होत आहे. आदिपुरुष सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमात श्रीरामाची भूमिका साकारली आहे अभिनेता प्रभासने. प्रभासने आदिपुरुषच्या फायनल ट्रेलरमध्ये दमदार ऍक्शन दिसत आहे.

काल ६ जूनला तिरुपतीला प्रभास आणि आदिपुरुषच्या टीमच्या उपस्थितीत भव्य दिव्य फायनल ट्रेलर लाँच झाला. यावेळीच प्रभासने त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय.

प्रभासचं ते उत्तर

आदिपुरुषमध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासने दिलेल्या उत्तराने चाहत्यांना चर्चांना विषय मिळाला आहे. अलीकडेच आदिपुरुषचा अंतिम ट्रेलर लाँच करण्यात आला, जिथे प्रभासला त्याच्या चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारले.

मोस्ट हँडसम बॅचलरच्या यादीत प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे चाहते त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. आता एका चाहत्याने प्रभासला लग्नाबद्दल प्रश्न विचारला.. एरवी प्रभास या प्रश्नाचं उत्तर टाळतो पण यंदा मात्र प्रभासने थेट लग्नाचं ठिकाणच सांगितलं.

प्रभासचं नाव आधी अनुष्कासोबत

काही दिवसांपूर्वी प्रभासचे नाव अनुष्का शेट्टीसोबत जोडले जात होते. यानंतर त्याचे नाव आदिपुरुषची को-स्टार क्रिती सेननसोबत जोडले जात होते.

अशा परिस्थितीत फॅन प्रभासला प्रश्न विचारला गेला नाही तर ते नवल म्हणावं लागेल . यंदा प्रभासने लग्नाची तारीख सांगितली नसली तरी स्थळ निश्चितपणे सांगितले आहे.

तिरुपतीमध्येच लग्न करणार

तिरुपतीमध्येच लग्न करणार असल्याचे प्रभासने सांगितले. प्रभासचे हे उत्तर ऐकून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. प्रभासच्या फॅन्सना आता त्याच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. अशा परिस्थितीत बाहुबली स्टार लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

मात्र, ट्रेलर लॉन्चवेळी प्रभास एकदम आनंदी मूडमध्ये दिसला. आता प्रभास क्रिती सोबत लग्न करणार की आणखी कोणासोबत याचा उलगडा येत्या काळात होईलच. दरम्यान प्रभासची भूमिका असलेला आदिपुरुष सिनेमा १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तिरुपतीमध्ये स्क्रिनींग

दरम्यान तिरुपतीमध्ये प्रभासच्या आदिपुरुषच्या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं जी तयारी करण्यात आली आहे ती मोठी होती.

आदिपुरुषचा जो इव्हेंट आहे तो श्री वैंकटश्वेरय्या विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे. त्यासाठी प्रभासचे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीचे कट आऊट्स तयार करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT