अभिनेता प्रतीक बब्बरचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. मग ते त्याचं प्रेमप्रकरण असो किंवा वडिलांसोबतचे त्याचं नातं असो. याशिवाय आणखी एका गोष्टीबद्दल प्रतिक अनेकदा बोलतो.
प्रतिकच्या त्याची आई म्हणजे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील. प्रतीक आणि स्मिता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. वास्तविक प्रतीक बब्बरने आपले नाव बदलण्याची घोषणा केली आहे.प्रतिकचं नवं नाव त्याच्या दिवंगत आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण करुन देणारं असेल.
प्रतीक बब्बरने आता आपल्या आईला आदर म्हणून आपले नाव बदलून प्रतीक पाटील बब्बर असे ठेवले आहे. यासोबतच, त्याने असेही सांगितले की, आता चित्रपटांमध्ये त्याचं नाव तसेच राहावे अशी त्याची इच्छा आहे. प्रतीक हा स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा असून 15 वर्षांहून अधिक काळ अभिनय करत आहे. प्रतीकने सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे नावही बदलले आहे.
"माझे वडील आणि माझे संपूर्ण कुटुंब, माझे दिवंगत आजी आजोबा आणि माझ्या दिवंगत आईच्या आशीर्वादाने, मी माझ्या आईचे आडनाव माझे मधले नाव म्हणून जोडण्याचा निर्णय घेतला आहे, जे माझे नवीन स्क्रीन नाव देखील असेल," असे अभिनेत्याने एका निवेदनात म्हटले आहे. प्रतिक पाटील बब्बर असतील.
हा मुद्दा थोडा अंधश्रद्धेचा आणि थोडा भावनिकतेचा आहे, असंही प्रतिक म्हणाला. त्यांनी स्पष्ट केले की, 'जेव्हा माझे नाव एखाद्या चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये किंवा इतरत्र दिसते तेव्हा मला माझ्या नावाने तसेच माझ्या आईच्या विलक्षण आणि गौरवशाली वारशाची आठवण व्हावी असे मला वाटते. यासोबतच माझी आई स्मिता पाटील यांची क्षमताही मी लक्षात घ्यायला हवी.
1986 मध्ये प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर स्मिताजींचं निधन झालं. आपल्या दिवंगत आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, प्रतिक म्हणाला, "माझी आई माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा भाग असेल, मी माझी उर्जा लावली, ती तिने पाहिली नव्हती."आई नव्हती. पण माझ्या नावाचा भाग म्हणून त्यांचे आडनाव ठेवल्याने भावना दृढ होते. या वर्षी ती आपल्याला सोडून 37 वर्षे पूर्ण होईल, पण मी तीला विसरलेलो नाही. ती कधीही विसरली जाणार नाहीत याची मी काळजी घेईन. स्मिता पाटील माझ्या नावाने जगतील...'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.