DFO first look Release  Dainik Gomantak
मनोरंजन

सासाराम हत्याकांडावर आधारित DFO या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

गाजलेल्या सासाराम हत्याकांडावर आधारित DFO या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

DFO first look Release : सध्या इंडस्ट्रीत सत्य घटनांवर आधारित चित्रपटांचे प्रमाण वाढले आहे. आता भोजपुरी चित्रपटसृष्टीतही खऱ्या घटनांवर चित्रपट बनू लागले आहेत. 

निर्मात्याने आज बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील प्रसिद्ध सासाराम हत्या प्रकरणावरील भोजपुरी चित्रपट 'डीएफओ'चा फर्स्ट लुक रिलीज केला. यामध्ये अभिनेता यश कुमार मिश्रा एका IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

बिहारमधील हत्याकांडावर आधारित

भोजपुरी चित्रपट 'डीएफओ' हा बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील प्रसिद्ध सासाराम हत्या प्रकरणावर आधारित चित्रपट आहे. 

या चित्रपटाची कथा डिव्हिजन फॉरेस्ट ऑफिसर (डीएफओ) संजय सिंह यांच्या हत्येवर आधारित आहे, ज्यांची 2002 मध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. संजय सिंह यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक अधिकारी अशी आहे, त्यांच्या नावाने नक्षलवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली.

यश कुमार मिश्राने साकारली भूमीका

'डीएफओ' चित्रपटात आयएफएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा भोजपुरी अभिनेता यश कुमार मिश्रा म्हणतो, 'या चित्रपटासाठी मला खूप तयारी करावी लागली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला भोजपुरी सिनेमात वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची संधी मिळत आहे. 

मला या चित्रपटात काम करणे आव्हानात्मक वाटले कारण हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रेक्षक जेव्हा असे चित्रपट पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात खरी घटनाही कुठेतरी उपस्थित असते, त्यामुळे तुम्हाला काहीही दाखवता येत नाही.

DFO first look Release

बिहारच्या मातीतला चित्रपट

या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असलेले अजय सिंह म्हणतात, 'हा चित्रपट बिहारच्या मातीतला आहे आणि बिहारचे लोक याच्याशी जोडू शकतील. या चित्रपटात बरेच काही आहे जे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करेल, परंतु त्याबद्दल आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही. मला असे नक्कीच म्हणायचे आहे की अशा चित्रपटांनी भोजपुरी चित्रपटांच्या इतिहासात एक ट्रेंड सेट केला आहे.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT