बहुप्रतिक्षीत 'पुष्पा: द राइज' प्रदर्शित अ‍ॅक्शनसह धमाकेदार चित्रपट

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

Pushpa Release: बॉक्स ऑफिसवर अ‍ॅक्शनसह धमाकेदार एंट्री

अल्लू अर्जूनचा 'पुष्पा: द राईज' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दैनिक गोमन्तक

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या पुष्पा द राईज या चित्रपटाची (Movie) चाहते खुप आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. पुष्पा आज थेटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चंदनाच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या आशा होती. हा चित्रपट लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे की नाही हे पाहूया.

कथा:

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना, पुष्पा राज (अल्लू अर्जुन) हा एक चंदन झाडाची तस्करी करणार चोर आहे. यामुळे त्याला पोलिस खात्याशीही सामना करावा लागतो. तिरूपतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटमध्ये रश्मिकाने अल्लू अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये पुढे काय होते हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागतो.

* रिव्यु

या चित्रपट अॅक्शनी परिपूर्ण आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) वन मॅन आर्मीसारख्या चित्रपटातून सर्वांची मने जिंकताना दिसला आहे. त्याची बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी, अॅक्शन जबरदस्त आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटाप्रमाणे अॅक्शन सिक्वेन्सही धमाकेदार आहेत. अल्लू आणि रश्मिकाची प्रेम कहाणी खुप मनोरंजन करते. इंटरवेलनंतरची काही दृश्य अतिशय प्रेक्षणीय आहेत.

* अॅक्टिंग

चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लुक खूपच वेगळा आहे. ती लोकांच्या अपेक्षांवर खरी उतरताना दिसली आहे. पुष्पा द राईज वन मॅन आर्मीमध्ये व्यस्त आहे. अल्लू अर्जुन संपूर्ण चित्रपटात दिसला आहे. चित्रपटाच्या शेवटी फहद फासिलची एंट्री होते पण त्याने अल्पावधीतच प्रेक्षकांवर आपला प्रभाव सोडला आहे.

अल्लू अर्जुनाचा अभिनय, लव्ह ट्रॅक. अॅक्शन सीन्स आणि फरादची एंट्री यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अॅक्शनने भरलेला हा चित्रपट आवर्जून पाहावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT