Shahrukh khan's Dunky Vs Prabhas Salar Dainik Gomantak
मनोरंजन

शाहरुखच्या डंकीशी टक्कर नाहीच... सालारची रिलीज डेट पुढे ढकलली?

अभिनेता शाहरुख खान आणि साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटाची टक्कर होणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना पडला आहे.

Rahul sadolikar

Shahrukh khan's Dunky Vs Prabhas Salar : गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटासोबतच प्रभासच्या सालार चित्रपटाबद्दलही फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता दिसुन येत आहे.

डंकी आणि सालार एकत्र रिलीज झाले तर प्रभासच्या सालारलाच त्याचा फटका बसू शकतो यामुळे साहजिकच सालारची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डंकी आणि सालार

सुपरस्टार शाहरुख खानचा 'डंकी' आणि प्रभासचा 'सालार' बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. शाहरुख खान आणि प्रभास या दोघांचेही चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. 

अशा परिस्थितीत 'डंकी'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पोस्टर आणि इतर तयारी सुरू केली आहे, परंतु 'सालार'चे निर्माते अगदी शांत बसले आहेत आणि प्रभासच्या चित्रपटाचे कोणतेही पोस्टर किंवा टीझर-ट्रेलर उघड केलेले नाही. 

अशा परिस्थितीत प्रभासच्या चाहत्यांच्या मनात ‘सलार’च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

रिलीज डेट पुढे जाणार?

झी न्यूजच्या वृत्तानुसार , प्रभासच्या चित्रपटाचा सालार या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही. सालारच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अशी बातमी समोर आल्यानंतर चित्रपट विश्वात खळबळ उडाली आहे. 

वृत्तानुसार, निर्माते सालार या वर्षी नाही तर पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलू शकतात. असे म्हटले जात आहे की हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्चपर्यंत म्हणजे 2024 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. एवढेच नाही तर सालार पार्ट 1 च्या रिलीजसोबतच मेकर्स पार्ट 2 ची रिलीज डेट देखील जाहीर करू शकतात असे बोलले जात आहे. 

याआधीही रिलीज डेट बदलली होती

ख्रिसमसपासून सालार चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सालारची रिलीज डेट याआधीही पुढे ढकलण्यात आली आहे.

 प्रभासचा 'सालार' हा चित्रपट यापूर्वी सप्टेंबरमध्ये शाहरुख खानसह जवानसह प्रदर्शित होणार होता. पण नंतर निर्मात्यांनी आधी चित्रपटाची रिलीज डेट काही दिवसांनी मागे ढकलली. 

रिलीज डेटमध्ये बदल

पण तरीही या गोष्टीमुळे काही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत हलवले. सालारची रिलीज डेट पुढे ढकलण्याचे निर्मात्यांनी दिलेले कारण म्हणजे चित्रपटाचे व्हीएफएक्स काम अजून पूर्ण झालेले नाही.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT